डोंबिवलीत 'या' तंत्राद्वारे रस्त्याचे सुपरफास्ट काम; खर्चातही बचत

Road
RoadTendernama

मुंबई (Mumbai) : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डोंबिवली शहरात पूर्व भागातील घरडा सर्कल ते आर. आर. रूग्णालयापर्यंतच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामामध्ये रस्त्यांचे खोदकाम न करता डांबरी पृष्ठभागावरच अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग (युटीडब्ल्यूटी) या कॉंक्रीटच्या थराचे काम करण्यात येत आहे. या पध्दतीमुळे वेळेची बचत होत असून नागरिकांची गैरसोय आणि खोळंबा टळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीत प्रथमच या तंत्रज्ञानाच्या आधारे काम हाती घेण्यात आले आहे.

Road
Bullet Train: 21 किमीच्या आव्हानात्मक बोगद्याचे टेंडर 'या' कंपनीला

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालयार्पयत रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे 13.8 कोटी रुपयांचे हे काम आहे. या कामामध्ये अद्ययावत अशा व्हाईट टॉपिंग पध्दतीचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या अद्ययावत पध्दतीमुळे नेहमीपेक्षा खर्चात अंदाजे चाळीस टक्के बचत होणार आहे. याशिवाय रस्त्याचे काम करताना सेवावाहिन्या, केबल्स, पाईपलाईन यांचे नुकसान होते. वेळेप्रसंगी त्यांचे स्थलांतरण करावे लागते. पण या अद्ययावत पध्दतीमुळे स्थलांतरण टाळता येते.

Road
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग म्हणजे काय?
अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग म्हणजेच बांधकाम क्षेत्रात ज्याला युटीडब्ल्यूटी तंत्रज्ञान असे संबोधले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता बांधकाम केले जाते. या पध्दतीत डांबरी रस्त्याचे खोदकाम करण्याची आवश्यकता भासत नाही. परिणामी वेळेची बचत होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com