Bullet Train: 21 किमीच्या आव्हानात्मक बोगद्याचे टेंडर 'या' कंपनीला

Bullet Train
Bullet TrainTendernama

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाचे टेंडर एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने पटकावले आहे.

Bullet Train
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या सी-2 पॅकेजसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. ठाणे खाडीखालून जाणाऱ्या भारतातील पहिल्या समुद्री भुयारी रेल्वेमार्गाचे टेंडर एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला मिळाले आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरमधील हा एक महत्वाचा टप्पा आहे. अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी २१ किमी लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे, यापैकी ७ किमी लांबीचा भुयारी मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. नुकतीच यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली.

Bullet Train
Stop! 'समृद्धी'वरून जाण्यासाठी आता 'हे' करावेच लागणारच...

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने शुक्रवारी (ता.९) रोजी मे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसोबत यासंदर्भात करार केला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र उभारण्यात येणाऱ्या पहिल्या ७ किमी लांबीच्या समुद्राखालची रेल्वे भुयारी मार्गासह २१ किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या टेंडरच्या तांत्रिक बिडिंग ९ फेब्रुवारी २०२३ रोजी उघडण्यात आले आणि ६ एप्रिल २०२३ रोजी आर्थिक टेंडर उघडण्यात आले. हा बोगदा बीकेसी भूमिगत स्थानक ते शिळफाटा दरम्यान असेल. ठाणे खाडीत ७ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील पहिला समुद्री बोगदा असेल. हा बोगदा एकेरी असून बोगद्यात दुपदरी ट्रॅक उभारणी करण्यात येईल. या बोगद्याच्या क्षेत्रात ३७ स्थानांवर ३९ उपकरण खोल्या उभारण्यात येतील.

Bullet Train
मोठी बातमी: पुढील वर्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन टेकऑफ

२१ किलोमीटर लांबीच्या बोगदा जमिनीच्या खाली २५-४० मीटर खोलीपर्यंत १३.३ मीटर व्यासाचा एकल-ट्यूब ट्विन-ट्रॅक संरचना असा असेल. त्याच्या २०.३७ किलोमीटर लांबीपैकी, तीन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) १५.४२ किलोमीटरची रचना तयार करतील, तर उर्वरित ४.९६ किलोमीटर लांबीचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनुसार केले जाईल. बोगदा ठाणे खाडी ओलांडून जाईल आणि खाडीखालील सर्वेक्षणाचे काम पाण्याखालील स्थिर अपवर्तन तंत्र वापरून केले गेले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. एनएचएसआरसीएलने महाराष्ट्रातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विरार, बोईसर आणि ठाणे स्थानकांच्या दर्शनी भागाचे डिझाईन्स प्रदर्शित केले आहेत. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचा मार्ग १५६ किलोमीटर इतका आहे. पहिल्या टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे टेंडर यापूर्वीच निघाले आहे. बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा 21 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून 7 किमीचा हा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट आहे.

Bullet Train
CM Shinde:मुंबईत पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यास सर्वंकष धोरण

"२१ किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरमधील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक आहे, ज्यामध्ये ठाणे खाडी येथे ७ किमी सागरी भुयारी रेल्वे मार्गाचा समावेश आहे. देशातील समुद्राखालील पहिल्या दुहेरी बोगद्याच्या बांधकामात तीन बोरिंग मशीन आणि ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर केला जाणार आहे."
- राजेंद्र प्रसाद, व्यवस्थापकीय संचालक, एनएचआरसीएल 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com