जागतिक दर्जाचे बर्ड पार्क पाहायला आता विदेशी जाण्याची गरज नाही, कारण...

Mumbai: पक्षी उद्यानासाठी बीएमसीचे १६६ कोटींचे टेंडर, सिंगापूरच्या प्रसिद्ध जुरोंग बर्ड पार्कचे सहकार्य घेणार
Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईच्या भागातील रहिवाशांना मुलूंड येथे १८ दुर्मीळ प्रजातींचे २०६ पक्षी असलेले जागतिक दर्जाचे पक्षी उद्यान पहायला आणि अनुभवायला मिळेल. मुलूंड (पश्चिम) येथील नाहूर गावात पक्षी उद्यान आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रस्तावित विकासासाठी मुंबई महानगरपालिकेने टेंडर (Tender) काढले आहे.

Mumbai
$1 Trillion Economy: फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाला बूस्टर; राज्यात 34 हजार कोटींच्या...

महापालिकेच्या इमारत देखभाल विभागाने हे टेंडर काढले आहे, टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. हे पक्षी उद्यान १६६ कोटी रुपये खर्च करून बांधले जाईल. प्रस्तावित मुलूंड पक्षी उद्यान १७,९५८ चौरस मीटर भूखंडावर बांधले जाईल आणि भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले पार्क आणि प्राणीसंग्रहालयाचे उपकेंद्र असणार आहे.

११० वर्षांनंतर, मुंबईला मुलूंडमध्ये एक नवीन पक्षीगृह मिळणार आहे. ब्रिटिशांनी एका शतकापूर्वी मुंबईत पहिले प्राणीसंग्रहालय स्थापन केले होते आणि आता, स्वतंत्र भारतात, शहरात उभारले जाणारे हे पहिलेच पक्षी उद्यान असेल, असे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा म्हणाले.

प्रकल्पाचे काळजीपूर्वक नियोजन केले गेले आहे. पक्षी उद्यान खरोखरच जागतिक दर्जाची सुविधा निर्माण करण्यासाठी सिंगापूरच्या प्रसिद्ध जुरोंग बर्ड पार्कशी सहकार्य करण्याचा विचार आहे. आता सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेल्या पूर्व उपनगरातील नागरिकांना तसेच नवी मुंबई आणि ठाण्यातील रहिवाशांना या बर्ड पार्कचा खूप फायदा होईल. हे एक प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणूनही उदयास येईल.

Mumbai
12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 'शक्तिपीठ'च्या भूसंपादनासाठी 20 हजार कोटी

पक्षी उद्यानात प्रशस्त आणि नैसर्गिक निवारे असतील. हे पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारख्याच भागात वाढण्यास मदत करेल. पक्षी उद्यानात पक्षी पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह आणि प्रवाहासह पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी खुले प्लाझा देखील असेल.  या पक्षी उद्यानात संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि पक्षी तज्ज्ञांची व्याख्याने देखील आयोजित केली जातील, असे आमदार मिहिर कोटेचा म्हणाले.

मुलुंडमधील पक्षी उद्यानासंदर्भात एप्रिलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मुलूंड भूखंडाचे आरक्षण पक्षी उद्यानासाठी प्राणीसंग्रहालय असे बदलले. त्यापूर्वी, मुलूंड पक्षी उद्यानाचा प्रस्ताव जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कोटेचा यांनी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता.

या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्षांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या झालेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com