Mumbai-Thane: मुंबईत आकाराला येतेय नवे इंजिनिअरिंग मार्व्हल!

दक्षिण मुंबई ते ठाणे जोडणारा हा प्रकल्प मुंबईच्या पूर्व उपनगरातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकणार
Mumbai to Thane In 30 Mints
Mumbai to Thane In 30 MintsTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात आणि पायाभूत सुविधांच्या जाळ्यात आमूलाग्र बदल घडवणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आता आकाराला येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेले पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण आधुनिक अभियांत्रिकी आणि शहर नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.

Mumbai to Thane In 30 Mints
नाशिक मुंबई लोकल प्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार

दक्षिण मुंबई आणि ठाणे या दोन महत्त्वाच्या टोकांना जोडणारा हा प्रकल्प मुंबईच्या पूर्व उपनगरातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते ठाणे हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होईल.

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना. मुंबई महानगर प्रदेशात प्रथमच अशा प्रकारच्या उन्नत मार्गासाठी 'एकल खांब' म्हणजेच एकाच पिलरवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जमिनीवरील जागेचा तुटवडा आणि खालील वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

जवळपास चौदा किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण सहा पदरी मार्ग जमिनीपासून उंचावर बांधला जात असून, तो घाटकोपरमधील छेडानगरपासून थेट ठाण्यातील आनंद नगरपर्यंत जाणार आहे. या रचनेमुळे सध्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून, खालील रस्ता स्थानिक वाहतुकीसाठी मोकळा श्वास घेऊ शकेल.

Mumbai to Thane In 30 Mints
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवनातील 35 एकरवर अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र

ठाण्यातील आनंद नगर ते साकेत उड्डाणपुलाजवळ हा मार्ग आणखी एका उन्नत मार्गाशी जोडला जाईल. यामुळे भविष्यात मुंबईतून नाशिककडे जाणाऱ्या आणि समृद्धी महामार्गावरून विदर्भाकडे जाणाऱ्या वाहनांना थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. म्हणजेच, दक्षिण मुंबईतून निघालेले वाहन कोणत्याही सिग्नलशिवाय आणि वाहतूक कोंडीत न अडकता थेट राज्याच्या महामार्गांवर पोहोचू शकेल.

या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी मुलुंड चेक नाका, ऐरोली चौक आणि विक्रोळी चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी चढण्या-उतरण्यासाठी स्वतंत्र मार्गिकांची (रॅम्प) सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवघर उड्डाणपुलाजवळ चक्क जमिनीच्या वरच्या पातळीवर म्हणजेच उन्नत स्वरूपात पथकर नाका उभारण्यात येणार आहे. तीन अधिक तीन अशा सहा मार्गिका असलेला हा पथकर नाका देखील आधुनिक स्थापत्यशास्त्राचा नमुना असेल.

Mumbai to Thane In 30 Mints
Air Pollution: मुलुंडचा श्वास कोंडला! मेट्रो कंत्राटदाराचा हलगर्जीपणा भोवला

विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे हे या पायाभूत प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याऐवजी, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी ते घाटकोपर या टप्प्यातील रचनेत बदल करण्यात आले आहेत. यामुळे गुलाबी ट्रम्पेटची शंभरहून अधिक झाडे वाचवण्यात यश आले असून, भरपाई म्हणून चार हजारांहून अधिक नवीन वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

सध्या या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण, जमिनीची तपासणी आणि चाचणीचे काम पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष बांधकाम वेगाने सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते ठाणे हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com