Mumbai : रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेचा नवा फंडा; डांबराचा पुनर्वापर करणार

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील डांबरी रस्त्यांसह सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांसाठी नवीन प्रयोग केला जाणार आहे. डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी जुन्या वापरलेल्या डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्र खरेदी करणार आहे.

Mumbai
Mumbai : विकासकामे दर्जेदार, निश्चित वेळेत व मंजूर अंदाजपत्रकानुसारच अपेक्षित; आयुक्तांच्या अभियंत्यांना सूचना

या रिसायकलिंग यंत्राद्वारे खड्डे दुरुस्तीबरोबरच दाग, रुटींग, तडे तथा चिरा (क्रॅक्स), तुटलेल्या कडा आदींची दुरुस्ती करता येते. या तंत्रज्ञानाद्वारे जुने पुनरुत्पादित केलेले हॉट मिक्स बीसी आणि नवीन हॉट मिक्स बीसी हे नवीन इन्फ्रारेड किरणांद्वारे समान तापामानावर आणून कॉम्पॅक्ट केले जाते. या यंत्राच्या सहाय्याने खड्डे बुजण्यासाठी लागणारे साहित्य, रस्ता सुरक्षा उपकरणे, कंपन पेल्ट कॉम्पॅक्टर या सर्वांना एकाच कंटेनरच्या छोट्या ट्रकमध्ये समाविष्ट केले जाईल. या इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्राच्या खरेदीसाठी प्रसिद्ध केलेल्या टेंडरमध्ये प्रिती कंस्ट्रक्शन कंपनीला यंत्र खरेदी आणि दोन वर्षांची देखभाल व दुरुस्ती आदींसाठी ७ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Mumbai
Mumbai : MMRDA चा 300 कोटींचा 'तो' प्रकल्प का सापडला वादात? टेंडर वाटपात घोळ?

कंपनीने अंदाजित दरापेक्षा ३४.१४ टक्के दराने म्हणजे ९.५१ कोटी रुपयांची बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर झालेल्या वाटाघाटीनंतर संबंधित कंपनीने विविध करांसह ७.१७ कोटी रुपयांमध्ये हे काम करण्यास तयारी दर्शवली आहे. यामध्ये यंत्र खरेदीची किंमत जीएसटीसह १.४७ कोटी रुपये एवढी असून त्यावरील खर्चासाठी ४.२७ कोटी रुपये तसेच एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर एक वर्षांच्या देखभालीसाठी ६० हजार रुपये अशाप्रकारे ७.२७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com