उज्जैनच्या 'महाकाल'च्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट; 500 कोटींची तरतूद

Siddivinayak Temple
Siddivinayak TempleTendernama

मुंबई (Mumbai) : प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा व पुनर्नियोजनाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. महानगरपालिकेने सिद्धीविनायक मंदिरासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेने या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, वास्तुशास्त्रज्ञ यांची यासाठी निवड केली जाणार आहे.

Siddivinayak Temple
Good News : अवघ्या 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा; कोस्टल रोड संपूर्णच खुला होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धीविनायक मंदिराच्या पुनर्नियोजनाच्या प्रकल्पाची घोषणा नुकतीच एका कार्यक्रमात केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले की, सिद्धीविनायक मंदिराचा डीपीआर सुद्धा चांगला झाला पाहिजे. हे मंदिर सुद्धा अजून उत्कृष्ट सुंदर झाले पाहिजे. त्यामुळे मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आणि पुनर्नियोजनासाठी उज्जैन मंदिराच्या आर्किटेक्चरची नियुक्ती करण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल, यासाठी महापालिकेमार्फत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

Siddivinayak Temple
Mumbai : मुंबईकरांसाठी Good News! 'या' ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे मंदिरावर हल्ल्याच्या धमक्या सतत येत असतात. अनेकदा मंदिराला धोका असल्याची चर्चा होत असते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र दिवसेंदिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मंदिर परिसराचाही कायापालट करण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने हाती घेतला असल्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाने या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार असून त्याकरीता महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, वास्तुशास्त्रज्ञ यांची यासाठी निवड केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com