Mumbai : महापालिकेला ठेकेदाराची काळजी; ठेकेदाराकडे कामे नसल्याने कंत्राटासाठी शिफारस

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील ५० छोट्या पुलांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सुमारे ४१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये नव्या पुलांची उभारणी, जुन्या-जीर्ण झालेल्या पुलांची डागडुजी, काही पुलांच्या मार्गिकेचा विस्तार अशा कामांचा समावेश आहे. लघुत्तम टेंडर आणि कंपनीकडे सध्या कोणतीही कामे नाहीत, अशी दोन कारणे महापालिकेने संबंधित कंपनीची टेंडरसाठी शिफारस करताना दिले आहे.

BMC
Winter Session : शिंदे सरकारच्या दिमतीला नागपुरात 500 हून अधिक गाड्यांचा ताफा; टेंडरही निघाले 

वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड या भागांचा समावेश असलेल्या तीन विभागांतील पुलांची कामे हाती घेतली जाणार आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी मे. एस.जी.सी. कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर मालाड पी-उत्तर वॉर्डमधील १६ पूल, गोरेगाव पी-दक्षिण येथील २१ पूल आणि अंधेरी के-पश्चिम वॉर्डमधील १३ पुलांची निवड करण्यात आली.

BMC
Mumbai : 20 वर्षांपासून रखडलेल्या 'त्या' पुलासाठी अखेर टेंडर; 42 कोटींचे बजेट

मे. सी.ई. इन्फ्राचे (इंडिया) टेंडर कमी किमतीचे असल्याने या कंपनीला टेंडर देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या कंपनीने सप्टेंबर महिन्यात महापालिकेला पत्र पाठवले होते. आमच्याकडे स्वतःच्या मालकीचे साहित्य आणि यंत्रे आहेत, तसेच सद्य:स्थितीत आमच्याकडे काम नसल्याने आमचे बरेच कामगार कामाशिवाय बसून आहेत, असे या पत्रात म्हटले होते. लघुत्तम टेंडर आणि कंपनीकडे सध्या कोणतीही कामे नाहीत, अशी दोन कारणे महापालिकेने संबंधित कंपनीची टेंडरसाठी शिफारस करताना दिले आहे. या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी मे. सी.ई. इन्फ्रा (इंडिया) आणि मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि. या दोन कंपन्यांनी टेंडर भरले होते. मे. सी.ई. इन्फ्रा (इंडिया) या कंपनीने २४ कोटी ४१ लाख ५३ हजार ५८३ कोटी रुपयांची, तर मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि.ने २७ कोटी ८८ लाख ४२ हजार ११० कोटी रुपयांचे टेंडर भरले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com