मुंबई महापालिकेचे खड्डे बुजविण्यासाठी यंदा 100 कोटींचे उड्डाण

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेने १०० कोटी रुपयांहून अधिकची टेंडर प्रसिद्ध केली आहेत. गेल्यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी १५५ कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा शहरातील सात परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ७९ कोटी रुपये तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यंदा शहरातील खड्डे डांबरानेच बुजवले जाणार आहेत.

BMC
Devendra Fadnavis : सिडकोचा 'हा' प्रकल्प नवी मुंबईला देणार नवी जागतिक ओळख

मुंबईत आतापर्यंत १२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. सध्या मुंबईत एकाच वेळी ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या परिमंडळनिहाय टेंडरनुसार खड्डे बुजवण्याचा अंदाजे खर्च ७९ कोटी रुपये इतका आहे. गेल्यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी १५५ कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा खर्चात सुमारे ५१ टक्के कपात करण्यात आली आहे.

BMC
Mumbai : पूर्व द्रुतगती महामार्गावरील ‘त्या’ चौकात हवे 2 नवे रस्ते, 4 फ्री लेफ्ट टर्न रस्ते

मुंबई महापालिकेने यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स, कोल्ड मिक्स, जिओ पॉलिमर अशा विविध पर्यायांची चाचपणी केली होती. यंदा मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच मास्टिक अस्फाल्ट म्हणजेच डांबरानेच खड्डे बुजवले जाणार आहेत. शहरातील ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते आणि ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते लक्षात घेऊन टेंडर काढण्यात आली आहेत.

असा होणार परिमंडळनिहाय खर्च -

● परिमंडळ १ – चर्चगेट, कुलाबा – ८ कोटी ७८ लाख

● परिमंडळ २ – परळ, वरळी, प्रभादेवी, दादर – १२ कोटी ६३ लाख

● परिमंडळ ३ – वांद्रे पूर्व, पश्चिम, अंधेरी ते जोगेश्वरी पूर्व – १० कोटी ४७ लाख

● परिमंडळ ४ – अंधेरी ते जोगेश्वरी पश्चिम आणि पूर्व भाग, गोरेगाव, मालाड – १३ कोटी ५४ लाख

● परिमंडळ ५ – कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द – २ कोटी ७३ कोटी

● परिमंडळ ६ – घाटकोपर, भांडूप, मुलुंड – १० कोटी ३८ लाख

● परिमंडळ ७ – दहिसर ते कांदिवली – १० कोटी ४७ लाख

● पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग – २५ कोटी

● एकूण – १०४ कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com