Mumbai : पूर्व द्रुतगती महामार्गावरील ‘त्या’ चौकात हवे 2 नवे रस्ते, 4 फ्री लेफ्ट टर्न रस्ते

Mumbai
Mumbai Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पूर्व द्रतगती मार्गावरील मुलुंड-ऐरोली जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्री राम चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी महापालिका प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली आणि प्रभू श्री राम चौकातील तसेच ऐरोलीकडे जाताना होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन नवीन रस्ते प्रकल्प विकसित करण्याची मागणी केली. गगराणी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागाला काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आमदार मिहिर कोटेचा म्हणाले.

Mumbai
Mumbai : 'त्या' 3 प्रमुख मार्गांवर लोकलच्या स्वतंत्र मार्गिका; 14 हजार कोटींचे बजेट

कोटेचा यांनी मुलुंड विधानसभा मतदारसंघाशी संबंधित विविध नागरी समस्यांवर गगराणी यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. "मुलुंड-ऐरोली जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्री राम चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाहतुकीत वाया जातो. म्हणून, मी प्रभू श्रीराम चौक (मुलुंड-ऐरोली जंक्शन) येथे ४ नवीन फ्री लेफ्ट टर्न रस्ते विकसित करण्याची मागणी केली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा १५ मिनिटांचा वेळ वाचेल, असे आमदार मिहिर कोटेचा म्हणाले.

Mumbai
Mumbai Pune Expressway : आता मुंबई-पुणे द्रुतगतीवर बोरघाट लागणारच नाही; 95 टक्के काम...

कोटेचा पुढे म्हणाले की, ऐरोलीकडे जाणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्यांनी त्याच जंक्शनवर आणखी एक केबल स्टेड ब्रिज प्रस्तावित केला आहे. विद्यमान ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर त्याच प्रभू श्री राम चौकावर दुतर्फा केबल स्टेड ब्रिज देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. जेणेकरून ऐरोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचा १५ मिनिटे वेळ वाचेल, असेही आमदार मिहिर कोटेचा यांनी स्पष्ट केले. कोटेचा यांनी कमी दाबाने पाणीपुरवठा, चालू सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करणे, बांगलादेशी फेरीवाल्यांना हटविणे, रस्त्यावर गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई, कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंड बंद करणे यासह इतर मुद्द्यांवरही त्यांनी गगराणी यांच्यासोबत चर्चा केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com