मिठी नदीला गतवैभव देणार; सल्लागारासाठी ३६ कोटींचे टेंडर

Mithi River

Mithi River

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील महत्त्वाच्या मिठी नदीला पुन्हा एकदा गतवैभव मिळणार आहे. मुंबई महापालिकेकडून मिठी निदीचे पूर नियंत्रण, सौंदर्यीकरण, पुनरुज्जीवन आणि तलाव बनवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून 35 कोटी 87 लाख 99 हजार 992 रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

Mithi River

नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठी 'इतक्या' हजार कोटींचे बजेट

महाराष्ट्र सरकारने मिठी नदी विकासासाठी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची स्थापना केली. मिठी नदीची एकूण लांबी 17.84 किमी असून त्यापैकी 11.84 किमी भाग महापालिका क्षेत्रात तर 6 किमी नदी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए)च्या अखत्यारीत येतो. मिठी नदीच्या एकूण 17.84 किमीच्या प्रवाहमार्गाच्या परिसरात झोपड्या असून या ठिकाणाहून जलप्रवाह, सांडपाणी मिठी नदीत येते. या पार्श्वभूमीवर नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकणे, इंटरसेप्टर्स बांधणे, नदीची उर्वरित संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.

Mithi River

मुंबई महापालिका 'असे' शोधणार उत्पन्नाचे नवे मार्ग

2019 मध्ये महापालिकेने 'मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प' हाती घेतला असून नदीची वहन व धारण क्षमता वाढवण्यासाठी खोलीकरण करणे, जपानी तंत्रज्ञानावर बोगदा बांधणे, मिठी नदीलगत कृत्रिम तलाव व पाणथळ तयार करणे, नदीला बारमाही वाहती केली जाणार आहे. ही कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखून आणि आर्थिक बाबींचा विचार करून काम करावे लागणार आहे. यासाठी सल्लागार नेमून अहवाल तयार केला जाणार आहे. यानुसार होणाऱ्या कामासाठी सुमारे 280 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Mithi River

EXCLUSIVE : मुंबई म्हाडा सभापतीपदावरुन राष्ट्रवादीत घमासान

महापालिकेच्या नियोजनानुसार अपेक्षित कामांचा आवाका पाहता या कामांसाठी जागतिक दर्जाचे सल्लागार नियुक्त करणे अनिवार्य आहे. जेणेकरून या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध होणार आहे. या कामांमध्ये अधिक स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त दोन सल्लागारांचे जॉइंट व्हेंचर करून टेंडर सादर करण्याची परवानगी इच्छूक ठेकेदारांना देण्यात येणार आहे.

कसे होणार काम?

- माहीम खाडीजवळ बंधारे बांधून पंप बसवणे

- पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जंगल वसवणे

- नदीकिनारी सुशोभीकरण, मनोरंजनाची साधने

- जलक्रीडा, उपाहारगृह, सामाजिक कार्यक्रमातून महसूल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com