BMC
BMCTendernama

अबब! मुंबईत 6 हजार बांधकामे सुरु; 891 बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस

Published on

मुंबई (Mumbai) : प्रदूषण रोखण्यासह धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी बांधकामांच्या ठिकाणी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक केले. यासाठी आधी समज, कारणे दाखवा नोटीस आणि त्यानंतरही दुर्लक्ष केले तर स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत शहरात ८९१ बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

BMC
नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची भेट; एमटीएचएल पाठोपाठ आता...

मुंबईत विविध प्राधिकरणाची सहा हजार बांधकामे सुरू आहेत; मात्र वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. यात बांधकाम ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे, स्प्रिकलर बसवणे, धुळीचे कण पसरू नये यासाठी पडदे लावणे, पाण्याची फवारणी करणे अशी नियमावली जारी केली. तसेच महापालिकेने ३ नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.

BMC
MTHL : एकीकडे लोकार्पणाची जय्यत तयारी तर दुसरीकडे आंदोलनाचा एल्गार

या सर्व बांधकामांना ऑनलाईन नोटीस बजावून धूळ प्रतिबंधक उपायोजना करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर कार्यवाही केली नसल्याने ६१० बांधकामांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी यानंतरही कार्यवाही होत नसल्याने ८९१ प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस दिली. स्टॉप वर्क नोटीस बजावल्यानंतर ५८ बांधकाम नियमांचे पालन करण्यास सुरुवात केल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Tendernama
www.tendernama.com