Mumbai : 14 हजार स्वच्छतागृहे बांधण्यासाठी लवकरच टेंडर; मंत्री लोढांची माहिती

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकिटचे होणार असल्याने पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त असतील. तसेच झोपडपट्टीतील एकतरी रस्ता सिमेंट क्राँकिटचा असेल, असे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. तसेच मुंबईत १४ हजार स्वच्छतागृहे बांधण्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हायवेवर स्वच्छतागृहे नसल्याने प्रवाशांची विशेषतः महिलांची गैरसोय होते. ही गैरसोय आता दूर होणार आहे. हायवेवर येत्या सहा महिन्यांत नवीन अत्याधुनिक स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

BMC
SRA : मुंबईत 'याठिकाणी' प्रथमच सर्वात उंच पुनर्वसन टॉवर; 16000 रहिवाशांना निवारा

लोढा म्हणाले की, "मंत्रालयात रोजची गर्दी लक्षात घेता, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री म्हणून कार्यालय उपलब्ध करण्यात यावे, असे पत्र आयुक्तांना दिले होते. त्यानंतर कार्यालय उपलब्ध झाले असून १० ते १२ दिवसांत १५० हून अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर माजी नगरसेवकांच्या माध्यमातून ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना मुख्यालयात कार्यालय हा काही राजकीय मुद्दा होत नाही."

BMC
Mumbai-Goa महामार्गाबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांचे भावनिक पत्र, वाचा काय म्हणाले...

झोपडपट्टी जवळपास असलेल्या स्वच्छतागृहांची डागडुजी व जुन्या धोकादायक स्वच्छतागृहांच्या जागी नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच नागरिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास संबंधितांना रेडीरेकनरनुसार मोबदला देऊन त्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारले जातील, असे महापालिकेचे नियोजन असल्याचे लोढा यांनी सांगितले. झोपडपट्टीत सध्या असलेली स्वच्छतागृहेही जुनी व असुविधांयुक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर ही स्वच्छतागृहांबाबत महापालिकेने निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे येत्या सहा महिन्यांत हायवेवर नवीन अत्याधुनिक स्वच्छतागृहे उपलब्ध केली जाणार आहेत. या स्वच्छतागृहांचा फायदा हायेवरून प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालकांना होणार आहे. विशेषतः महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य त्या सुविधा अधिक मिळणे गरजेचे आहे. महापालिकेच्या सायन रुग्णालयात पाहणी केली असून यापुढे प्रत्येक रुग्णालयाचा आढावा घेणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com