Mumbai
MumbaiTendernama

SRA : मुंबईत 'याठिकाणी' प्रथमच सर्वात उंच पुनर्वसन टॉवर; 16000 रहिवाशांना निवारा

मुंबई (Mumbai) : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) मुंबईतील धोबीघाट (महालक्ष्मी) येथे सर्वात उंच ४२ मजली पुनर्वसन टॉवर उभा राहिला आहे. या टॉवरमध्ये घरांचे वितरण सुरू झाले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेला, हा गृहनिर्माण प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुमारे १६ हजार झोपडपट्टीतील रहिवाशांना हक्काचा निवारा देणार आहे. पिरामल रियल्टी आणि ओमकार बिल्डर्स यांचा हा संयुक्तिक प्रकल्प आहे.

Mumbai
कसे असले पाहिजेत आदर्श डांबरी अन् सिमेंट रस्ते; प्रत्यक्षात यंत्रणा काय करते?

धोबीघाट सर्वात मोठ्या मैदानी खुल्या लॉन्ड्रींपैकी एक आहे. परिसरातील बहुतेक रहिवासी लॉन्ड्री-आधारित सेवांमध्ये गुंतलेले आहेत. हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी भागातील १२ एकर जागेवर पसरलेला आहे. या टॉवरमधून रेसकोर्स व अरबी समुद्राचे अथांग दर्शन होते. प्रामुख्याने धोबी आणि डाईंग, सुकवणे, वाहतूक, इस्त्री इत्यादी संबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या फायद्याचा आहे.

Mumbai
Eknath Shinde : गिरणी कामगारांच्या घरांसाठी 21 हेक्टर जागा; पुढच्या 3 महिन्यांत...

धोबीघाट येथील साईबाबा नगर, महालक्ष्मी येथे फेज 1 मध्ये सुमारे 1000 कुटुंबांना नवीन घरे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये 19 रिटेल युनिट्स देखील आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन टॉवरमध्ये हस्तांतरित करताना, धोबीघाटाच्या सीमेवरील सोसायट्यांमधील सुमारे ५ हजार रहिवाशांचा त्यात समावेश आहे. या संपूर्ण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे अत्याधुनिक बांधकाम करण्यात येत असून या प्रकल्पातून कल्याण केंद्रे, सोसायटी कार्यालये आणि बालवाडी यांच्यासाठी मोकळ्या जागा असणार आहेत. पुनर्वसन विकासासाठी गुणात्मक मापदंड देखील प्रकल्पात निश्चित करण्यात आला आहे. हा ४-टॉवरचा प्रकल्प अग्रगण्य जर्मन ब्रँड 'शिंडलर'च्या १६ उद्वहनाने देखील (लिफ्ट) सज्ज आहे.

Mumbai
Mumbai-Goa महामार्गाबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांचे भावनिक पत्र, वाचा काय म्हणाले...

धोबी व्यवसायाची वार्षिक उलाढाल वार्षिक अंदाजे १२५ कोटी रुपये आहे. रहिवाशांचा एक मोठा गट त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लाँड्री व्यवसायाशी संबंधित आहे. नव्या पिढीतील अर्ध्याहून अधिक धोबी पारंपरिक कौटुंबिक व्यवसायातून बाहेर पडले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे धुण्याच्या आणि वाळवण्याच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे कपडे धुण्याची पारंपरिक धोबी पद्धत कालबाह्य होत आहे. धोबी धुलाईमध्ये त्यांचे कौशल्य सुधारत आहेत. ज्यासाठी कमी प्रमाणात पाणी लागते आणि आरोग्य धोक्याची शक्यता कमी होते. या प्रकल्पातील बहुतांश रहिवासी हे धोबी व्यवसायातील आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com