Mumbai : मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर सौंदर्यीकरणासाठी 280 कोटी; प्राचीन स्थापत्य शैली वापरणार

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाच्या विकासासाठी सुमारे ३३५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेने या विकासकामांना निधी द्यावा असे निर्देश देण्यात आले.

BMC
Eknath Shinde : MMR मधील 'या' महापालिका, नगरपालिकांसाठी Good News! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजी अली प्राचीन देवस्थान आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात. महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचे देखील सौंदर्यीकरण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना त्याच ठिकाणी स्वच्छतागृहांची देखील व्यवस्था करावी. मंदिरांचे सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्य शैलीचा देखील वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महापालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर मुंबादेवी मंदिर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटी, जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी तर भागोजी शेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

BMC
Mumbai : मुंबईकरांसाठी Good News! 'या' ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क

यावेळी महालक्ष्मी मंदिर, मुंबा देवी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजी शेट कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. जगन्नाथ शंकरशेट स्मारक वडाळा येथे करण्यात येत असून मुंबई महानगरपालिकेने तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकरशेठ, जिमी शंकरशेट आणि पद्मिनी शेठ आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com