
मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. प्रवासी आता 'अक्वा लाईन' (लाईन-३) वरील मेट्रोची तिकिटं थेट मोबाईलवरील अनेक प्रसिद्ध ॲप्स वापरून खरेदी करू शकणार आहात.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) सोबत करार केला आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी वेगळं ॲप डाउनलोड करण्याची किंवा रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. हे एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे, ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक डिजिटल आणि सोयीस्कर होईल.
आता 'लाईन-३' साठी खालील ॲप्स वापरून QR कोड असलेलं तिकीट खरेदी करू शकता:
* EaseMyTrip
* Highway Delite
* Miles & Kilometres (टेलीग्राम द्वारे)
* OneTicket
* RedBus
* Tummoc
* Yatri – City Travel Guide
विशेष म्हणजे, 'OneTicket' ॲप वापरून प्रवासी मुंबई मेट्रोच्या इतर लाईन्स (लाईन-१, २ए आणि ७) साठी देखील तिकीट काढू शकतात. याबद्दल बोलताना, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक, अश्विनी भिडे म्हणाल्या, "मेट्रो लाईन-३ ला ओनडीसी ONDC सोबत जोडणं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे शहरी वाहतूक व्यवस्था अधिक सोयीची आणि सर्वांसाठी उपलब्ध होईल. अनेक विश्वसनीय ॲप्सद्वारे QR तिकिटांची सोय उपलब्ध करून, आम्ही प्रवाशांना अधिक सुविधा देत आहोत आणि डिजिटल भारताच्या स्वप्नाला साकार करत आहोत."