Mumbai Infra: मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एमएमआरडीएची मोठी भर

अंधेरी-जेव्हीएलआर 'मिसिंग लिंक' प्रकल्पात ५५८ मेट्रिक टन वजनाच्या स्पॅनचे यशस्वी लाँचिंग
MMRDA
MMRDATendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडला जेव्हीएलआरशी (पूनम नगर) जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पात एमएमआरडीएने मोठे अभियांत्रिकी यश मिळवले आहे.

मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि गुंतागुंतीच्या इन्फिनिटी मॉल जंक्शनवर ५५८ मेट्रिक टन वजनाचा अवाढव्य स्पॅन सुरक्षितपणे आणि यशस्वीरीत्या स्थापित करून एमएमआरडीएने पुन्हा एकदा आपल्या अभियांत्रिकी कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे.

MMRDA
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मेगा प्लॅन! टेन्ट सिटी अन् ज्योतिर्लिंग जोडणारी हेलिकॉप्टर सेवा

मुंबईच्या वेगवान विकासात रस्ते आणि मेट्रोच्या जाळ्यांचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच साखळीत एमएमआरडीएने अंधेरी ते जेव्हीएलआर या 'मिसिंग लिंक' प्रकल्पांतर्गत एका अत्यंत आव्हानात्मक टप्प्यावर विजय मिळवला आहे. इन्फिनिटी मॉल जंक्शन, जे पश्चिम उपनगरातील वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे, तिथे तब्बल ५२ मीटर लांबीचा विशेष स्टील स्पॅन यशस्वीरीत्या बसवण्यात आला आहे.

या कामाची व्याप्ती थक्क करणारी आहे. हा स्पॅन तयार करण्यासाठी ४६.५ मेट्रिक टन वजनाचे एकूण १२ स्टील कॉम्पोझिट गर्डर्स वापरण्यात आले आहेत, ज्यांचे एकत्रित वजन ५५८ मेट्रिक टन इतके भरते. इतक्या प्रचंड वजनाचा आणि लांबीचा हा स्पॅन जागेवर बसवणे हे केवळ तांत्रिक काम नसून उत्कृष्ट नियोजन, अचूक अभियांत्रिकी आणि विविध विभागांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

MMRDA
Nashik Airport: ओझर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला मार्च 2027 ची डेडलाइन

हे काम पूर्ण करणे सोपे नव्हते, कारण ज्या ठिकाणी हे लाँचिंग करण्यात आले, ते इन्फिनिटी मॉल जंक्शन हे मुंबईतील शहरी अभियांत्रिकीच्या दृष्टीने सर्वाधिक गुंतागुंतीच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी जमिनीवरील वाहतुकीव्यतिरिक्त, वरच्या बाजूला दोन वेगवेगळ्या मेट्रो लाईनचे जाळे आहे. एका स्तरावर मेट्रो लाईन-२A धावत आहे, तर त्याच्या वरच्या स्तरावर मेट्रो लाईन-६ चे काम प्रगतिपथावर आहे.

अशा परिस्थितीत, जिथे जागा अत्यंत मर्यादित होती आणि थोडीशी चूकही मोठ्या धोक्याला आमंत्रण देऊ शकत होती, तिथे एमएमआरडीएच्या टीमने हे आव्हान स्वीकारले. कार्यरत मेट्रोच्या वेळापत्रकावर परिणाम न होऊ देता आणि सुरक्षेचे उच्चतम मानदंड पाळत, अभियंत्यांनी ही लाँचिंग प्रक्रिया अचूकपणे पूर्ण केली.

MMRDA
'दस का दम'! मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील वाहतूक कोंडीवर 'दहा'चा उपाय

हा स्पॅन पश्चिम उपनगरांच्या वाहतूक कोंडीला फोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हा भाग 'मिसिंग लिंक' प्रकल्प आणि मेट्रोच्या डबल-डेकर फ्लायओव्हरला जोडतो, ज्यामुळे दोन प्रमुख परिवहन प्रणाली एकमेकांना प्रभावीपणे जोडल्या गेल्या आहेत. लिंक रोड (अंधेरी पश्चिम) ते पूनम नगर (जेव्हीएलआर) या मार्गावर भविष्यात होणाऱ्या वाहतुकीसाठी हा पूल मैलाचा दगड ठरणार आहे.

एमएमआरडीएच्या या कामगिरीमुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांचा प्रवास अधिक गतीमान, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com