राज्य सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis, Maharashtra Government, MantralayaTendernama

Big News: लाखो मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 25 हजारांहून अधिक इमारतींना मिळणार...

Ashish Shelar: ‘ओसी’ मिळवण्याचा मार्ग मोकळा; २ ओक्टोबरपासून अंमलबजावणी
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई महापालिकेच्या (BMC) विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा (MHADA), एसआरए (SRA) आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकार धोरण आणणार आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
'ते' प्रकल्प ठरणार नागपूरच्या विकासात गेम चेंजर

मुंबई महानगरपालिका, नगर विकास, महसूल आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अशी मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

लाखो मुंबईकर अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरात राहूनही कायदेशीरदृष्ट्या "बिगरवासी" म्हणून राहत होते. यात नागरिकांचा काहीही दोष नसून, त्याकाळच्या नियमांमधील पळवाटा किंवा विकासकांच्या चुका यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी नगर विकास विभाग २ ऑक्टोबरपासून एक नवे धोरण लागू करणार आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Exclusive: राज्याच्या आरोग्य विभागाकडून विनाटेंडर 100 कोटींच्या खरेदीचा घाट

या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ओसी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परवानगीच्या क्षेत्रफळातील फरक, सेटबॅकशी संबंधित अडचणीसारख्या कारणांमुळे ओसी रोखल्या गेलेल्या इमारतींनाही दिलासा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे, नियमावलीतील बदल, धोरणातील बदल यामुळे अडकलेल्या इमारतींनाही मोकळीक मिळेल. तसेच विकासकाकडून प्रशासनाला द्यावयाच्या जागा/फ्लॅट्स न दिल्यामुळे नागरिक अडचणीत असतील तरीही त्यांना ओसी मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पारदर्शक पध्दतीने ही ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
मंत्री संजय शिरसाठांच्या खात्यात पुन्हा 'टेंडर' घोटाळ्याचे वादळ

भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोसायटींनी पुढाकार घ्यावा. नव्या धोरणात सोसायटींनी एकत्र येऊन किंवा वैयक्तिकरीत्या प्रस्ताव दिल्यास पार्ट-ओसी मिळू शकेल. जर कोणत्याही इमारतीने पहिल्या सहा महिन्यांत ओसी किंवा पार्ट-ओसीसाठी अर्ज केला, तर त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र अतिरिक्त वापरलेला एफएसआय असल्यास त्यासाठी लागणारा प्रीमियम भरावा लागणार.

२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या संधीचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.शेलार यांनी केले आहे. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस माजी खासदार गोपाल शेट्टी, स्थानिक आमदार मनिषा चौधरी आणि उत्तर मुंबईतील भाजपा पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com