Mumbai : 2 हजार कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला नव्या जागेची प्रतीक्षा

Mumbai Eye
Mumbai EyeTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या सौदर्यांत भर घालणारा आणि सुमारे २ हजार कोटी बजेट असलेला 'मुंबई आय' प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशनऐवजी अन्यत्र साकारला जाणार आहे. स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्यासह वांद्रे परिसरातील नागरिकांच्यी विरोधामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यात येत आहे.

Mumbai Eye
ट्रान्स हार्बर लिंक मुंबईचा कायापालट करेल; जपानच्या हिरोशींचे मत

मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच पर्यटनवाढीला चालना मिळावी या उद्देशाने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’या प्रकल्पाची एमएमआरडीएने घोषणा केली होती. वांद्रे रेक्लेमेशन येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. सुमारे १५० व्यासाचे जायंट व्हील ‘मुंबई आय’ प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करेल. मुंबईचे विहंगम दृश्य घडवण्याची ही योजना आहे. यासाठी सुमारे २००० कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र आता नवीन जागेच्या शोधामुळे हा प्रकल्प काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Eye
BMC: 1600 कोटींच्या डीसॅलिनेशन प्रकल्पासाठी लवकरच टेंडर

वांद्रे रेक्लेमेशन येथे या प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी वाहतूक प्रभाव आणि पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. तसेच या प्रकल्पाच्या सल्लागार नियुक्तीसाठीही एमएमआरडीएने टेंडर काढले होते. मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात येणार आहे. स्थानिक आमदार आशिष शेलार यांनीही वाहतुकीच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प वांद्रे रेलक्लेमेशन येथे अडचणीचा ठरत असल्याने या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. आता हा प्रकल्प वांद्रे भागातून इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. या प्रकल्पामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होईल, येथील शांतता भंग होईल, तसेच पर्यावरणीय दृष्टीकोनातूनही हा प्रकल्प इथे नको, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Mumbai Eye
Mumbai-Goa Highway डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार;दोन पुलांसाठी 68 कोटी

मी आणि स्थानिक नागरिक संघटनांचा सततचा पाठपुरावा आणि विरोधानंतर, एमएमआरडीएने आमची मागणी मान्य केली आणि वांद्रे रेक्लेमेशनच्या जागेवरून मुंबई आय हटविले आहे. एमएमआरडीए जी पर्यायी जागा शोधेल ती जागा मोठ्या प्रमाणात रहदारी आणि या प्रस्तावित पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या लोकांची गर्दी हाताळू शकेल!
- आमदार आशिष शेलार

2020 पासून आम्ही हा प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशनमध्ये नको म्हणून एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार करीत होतो. वांद्रे परिसरामध्ये वाहनतळासाठी पुरेशी जागा नाही. वाहतुकीचे इथे कोणतेही नियोजन होऊ शकले नसते. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीकोणातूनही हा प्रकल्प इथे नको ही आमची भूमिका होती.
- विद्या वैद्य, वांद्रे रेक्लेमेशन एरिया व्हॉलेंटीअर ऑर्गनायझेशन

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com