BMC: 1600 कोटींच्या डीसॅलिनेशन प्रकल्पासाठी लवकरच टेंडर

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करून मागणी आणि पुरवठा यामधील तूट कमी करण्याकरिता विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे २०० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नि:क्षारीकरण (डीसॅलिनेशन) प्रकल्प ४०० द.ल.लि. प्रतिदिनपर्यंत विस्तारित क्षमतेसह बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. सुमारे १,६०० कोटींच्या या प्रकल्पासाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहे.

BMC
Mumbai : देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे काम युद्धपातळीवर

या प्रकल्पाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण केले असून अहवालाची तपासणी सल्लागारामार्फत करण्यात आली आहे. सध्या टेंडर बनविण्याचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात असून प्रकल्प विकसित करण्यासाठी जागतिक स्पर्धात्मक टेंडर मागविण्यात येत आहेत. या कामासाठी सन २०२३-२४ मध्ये २०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी येत्या २ आठवड्यात टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.

BMC
पंढरपूर, अक्कलकोटला CM शिंदेंचे मोठे गिफ्ट; तब्बल 440 कोटींच्या..

दरम्यान, मुंबईत समुद्राचे खारे पाणी गोड करण्यासाठीचा प्रकल्प हा मुंबईकरांच्या ३५०० कोटींचा चुराडा करणारा आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा प्रीती मेनन यांनी यापूर्वी केला होता. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १६०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तर प्रकल्प चालवण्यासाठी १९०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रकल्प चालवण्यासाठी ३३ मेगा वॅट क्षमतेचा वीज प्रकल्पही उभारावा लागणार आहे. त्यामुळे अवघ्या २० वर्षांसाठीच्या कालावधीचा प्रकल्प हा मुंबईकरांवर लादू नये अशी मागणी आपकडून करण्यात आली होती.

BMC
CM in Action:नवीन रस्त्यातील खड्ड्याला लाखाचा दंड;नालेसफाईची पाहणी

या प्रकल्पासाठी भर समुद्रातून ४ ते ५ किलोमीटर अंतरावरून पाणी घेण्यात येईल. त्यामुळेच मच्छीमार बांधवांचे मासेमारीचे क्षेत्रही बाधित होईल. प्रकल्पाची मागणी नसताना फक्त इस्रायलच्या कंपनीने हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव ठेवला म्हणून प्रकल्पाला मंजूरी दिल्याचे मेनन यांनी सांगितले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या हट्टासाठी मुंबईकरांच्या मेहनतीच्या पैशांचा चुराडा करू नये, अशीही मागणी त्यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com