Mumbai : एमएमआरमधील 'इन्फ्रा' मजबूत करण्यावर भर; MMRDAचा 47 हजार कोटींचा अर्थसंकल्प

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई, ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच इतर घटकांसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए - MMRDA) २०२४-२५ या वर्षासाठी सादर केलेल्या ४७ हजार कोटींच्या अर्थसंकल्पी अंदाजपत्रकास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामध्ये मेट्रो, सागरी सेतू, उन्नत मार्ग, भुयारी मार्ग, कोस्टल रोड अशा सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांबरोबरच झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

Eknath Shinde
Nashik : इंडियाबुल्सला एमआयडीसीचा दणका; महिनाभरात 512 हेक्टर क्षेत्र खाली करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी अर्थसंकल्पात ४१ हजार ९५५.३४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत प्रकल्पांचा अवाका पाहता प्राधिकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६० हजार कोटीपर्यंतचे कर्ज उभारण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. तसेच प्रकल्पांसाठीच्या अतिरिक्त ३० हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीसाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना एमएमआरडीएला फारशी आर्थिक अडचण येणार नाही. या ४७ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांच्या तुटीची किनार आहे.

एमएमआरडीएने अर्थसंकल्पात प्रामुख्याने मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिल्याचे दिसत असून त्यावर ४१ हजार ९५५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. इतका खर्च हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पांवर करण्यात येणार आहे.

Eknath Shinde
Nashik : नाशिकचा GDP 5 वर्षांत होणार पावणेतीन लाख कोटी; जिल्ह्याच्या विकास आराखड्यात नेमकं काय?

प्रकल्प निहाय होणारा खर्च :

- मेट्रो मार्गिका आणि मेट्रो भवन - १७ हजार कोटी रुपये.

- एमटीएचएलवरील मुंबईच्या बाजूकडील वाहतूक पुढे सुरळीत व्हावी म्हणून शिवडी ते वरळी (पूर्व-पश्चिम) उन्नतमार्ग बांधण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक - ६०० कोटी

- ठाणे ते बोरीवली (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) ४ पदरी भुयारी मार्ग - ४००० कोटी रुपये.

- मुंबई शहरातील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मार्गापर्यंत वाहतुकीच्या दळणवळणासाठी उन्नत आणि भुयारी मार्गासाठी २४०० कोटी रुपये.

- सुर्या प्रकल्प, कवडास उन्नैयी बंधारा, सुर्या नदीवर पाच कोल्हापूर पध्दतीचे बांधकाम  काळू प्रकल्पासाठी ८८६ कोटी रुपये.

- बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग - ५०० कोटी रुपये.

- छेडानगर-घाटकोपर ते ठाणेपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण - ५०० कोटी रुपये.

- मुंबई, ठाणे व नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबाबतच्या कामावर २३२२ कोटी रुपयांचा खर्च करणार.

Eknath Shinde
Nashik : मंत्री दादा भुसेंच्या पीएविरोधात आमदार कोकाटेंनी का थोपटले दंड?

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करणे ही महत्वाची बाब असते. त्यासाठी आपण आर्थिक संस्थांबरोबरच राज्य सरकारकडून मोठा निधी घेतो. येणाऱ्या आर्थिक वर्षात आम्ही जास्तीत जास्त पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प पूर्णत्वास जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल.
-  डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए

एमएमआरडीएच्या माध्यमातून पायाभूत सुविधांना यंदा प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील रखडलेल्या अनेक प्रकल्पांना येत्या काळात चालना मिळेल. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, ठाणे कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार असल्याने विकासाला चालना मिळेल.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com