CSMT: मुंबईतील ही जगप्रसिद्ध इमारत होणार हायटेक; 1800 कोटींचा खर्च

CSMT
CSMTTendernama

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

CSMT
Nashik ZP : जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचांऐवजी...

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाचे टेंडर (Tender) १६ फेब्रुवारी रोजी खुले होणार आहे. सुमारे १,८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पुर्नविकास हायब्रीड बील्ड ॲापरेट पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के आणि ६० टक्के खासगी गुंतवणूक असणार आहे.
मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (CSMT) इमारत हे मुंबईत येणार्‍या पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. युनेस्कोने या इमारतीचा समावेश जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत केलेला आहे. सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे या पुनर्विकास प्रकल्पात भारतीय रेल्वेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाला १८१३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे.

CSMT
PM Modi: चालकाशिवाय धावणार मुंबई मेट्रो; स्वतः मोदींनी केली सफर

टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील पाच महिन्यात काम सुरू करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकाचे पुनर्विकासाचे काम अडीच वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. पुर्नविकासाचे काम हायब्रीड बील्ड ॲापरेट पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे ४० आणि खासगीची ६० टक्के गुंतवणूक असणार आहे.र

CSMT
Nashik ZP : अजबच! झेडपीसमोर चोरी गेलेला रस्ता शोधण्याचे आव्हान

सीएसएमटी स्थानकाच्या मध्यवर्ती रेल्वे मॉल प्रमाणे विकसित केले जाणार आहे. 2.54 लाख चौरस मीटरची जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार, लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे.

फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व इतर सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहणार आहेत.

CSMT
Nagpur: गडकरींच्या शहरातील रस्त्यांवरचे खड्डे थेट न्यायालयात...

पुनर्विकासाचे वैशिष्ट्ये
- सीएसएमटी स्थानकाचे वैभव जतन केले जाणार
- सर्व प्रवासी सुविधांसह विक्रेते, कॅफेटेरियासाठी जागा, पादचारी पूल रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठी स्वंत्रण ठिकाणे
- पार्किंगची सुविधा, रूफ प्लाझा आधुनिक सुविधांयुक्त प्लॅटफॉर्म, लिफ्ट/एस्केलेटर/ट्रॅव्हेलेटरची सुविधा दिव्यांगजनांसाठी सुविधा, सौरऊर्जा, जलसंवर्धन - पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन
- एकूण ३६ हेक्टर जागेत पुनर्विकास 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com