PM Modi: चालकाशिवाय धावणार मुंबई मेट्रो; स्वतः मोदींनी केली सफर

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास वेगवान करणाऱ्या मेट्रो (Mumbai Metro) रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Nashik ZP : जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचांऐवजी...

मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन ७ अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (यूटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत. सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे. या ट्रेनची डिझाईन ताशी वेग ९० किमी असून क्रियात्मक वेग ताशी ८० किमी आहे. तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे.

मुंबई मेट्रो २ अ आणि ७ ची वैशिष्ट्ये
-
मेट्रो 2 अ - दहिसर पूर्व ते डीएन नगर ६४१० कोटी खर्चाची १८.६ किमी मार्गिका असून १७ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.
- मेट्रो मार्गिका 7 - (अंधेरी पूर्व- दहिसर पूर्व) रुपये ६२०८ कोटी खर्चासह १६.५ किमी मार्गिका असून १३ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.
- या प्रकल्पांची किंमत जवळपास 12 हजार 618 कोटी आहे.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Nashik ZP : अजबच! झेडपीसमोर चोरी गेलेला रस्ता शोधण्याचे आव्हान

मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या टप्पा २ मधील स्थानके -

मेट्रो लाईन-२अ- टप्पा-२
वळनई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (पश्चिम).

मेट्रो मार्ग ७- टप्पा- २
गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व), मोगरा, गुंदवली.

वरील दोन्ही मेट्रो मार्गांसाठी दहिसर पूर्व हे संयुक्त स्थानक आहे.

मेट्रो मार्ग २अ- टप्पा- १
दहिसर (पूर्व), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर- I.C.  कॉलनी, एकसर, बोरिवली (पश्चिम), पहाडीएकसर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी.

मेट्रो मार्ग ७- टप्पा- १
दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे या स्थानकांचा समावेश आहे.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Davos : महाराष्ट्र उद्योजकांच्या पसंतीस; 1 लाख 37000 कोटींचे करार

एकात्मिक मेट्रो मार्गिका
पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने एकमेव सर्वसमावेशक मुंबई मेट्रो नेटवर्कच स्वप्न बघितल होते ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकराना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे
यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, म्हणजेच अंधेरी पूर्व) आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून मेट्रो मार्ग १ सह एकात्मिक केली आहे. दहिसर किंवा गोरेगाव ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे

रोलिंग स्टॉक

मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन 7 अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (यूटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत. सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे. या ट्रेनची डिझाइन ताशी वेग ९० किमी असून क्रियात्मक वेग ताशी ८० किमी आहे. तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे. स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पेसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दरवाज्यावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅपही आहेत.

सुरक्षा यंत्रणा
सर्व स्थानकावर बॅगेज स्कॅनिंग मशीन, हॅण्डहेल्‍ड मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे.

रूफ टॉप सोलार सिस्टिम
मेट्रो स्थानकावर रूफ टॉप सोलर सिस्टिमने सुसज्ज करण्यात येणार आहेत. ती रेस्को मॉडेलवर आधारित योजना आहे. स्थानक, डेपो आणि मागाठणे आरएसएस बिल्डिंगच्या छतावरची उपलब्ध जागा सोलार सिस्टिम बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ वरची स्थानक आणि संबंधित इमारतींवर बसवण्यात येणाऱ्या सोलार सिस्टिमची एकूण अंदाजित वीज निर्मिती क्षमता ३.० मेगावॅट - पीक एवढी असेल. सोलार सिस्टिमद्वारे निर्माण झालेली वीज स्थानकाच्या सहाय्यक भारांवर स्थानिक पातळीवर वापरली जाईल.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Public transport पुणेकरांची अवस्था 'एक ना धड भाराभर..!' कारण...

सार्वजनिक माहिती प्रणाली
प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सार्वजनिक घोषणा आणि माहिती प्रदर्शित करणारी यंत्रणा देण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सिग्नलींग, एस्कलेटर्स या सुविधाही करण्यात आल्या आहेत.

मेट्रो मार्ग ७ वरच्या स्थानकांना आयजीबीसीच 'प्लॅटिनम' मानांकन
पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देण्यात आले आहे. मेट्रो मार्ग ७ वरच्या १० मेट्रो स्थानकांना 'आयजीबीसी' तर्फे 'प्लॅटिनम' दर्जाचे मानांकन देण्यात आलं आहे. जोगेश्वरी (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवारीपाडा अशी या स्थानकाची नाव आहेत. आयजीबीसीच्या 'ग्रीन मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम रेटिंग प्रोग्राम' नुसार स्थानकाच मूल्यांकन करण्यात आले आहे. आयजीबीसीच्या मानांकन अहवालामध्ये मेट्रो मार्ग ७ साठीची पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी)ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आयएसओ १४००१ च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले आहे.

प्रवाशांची सुविधा व सुरक्षा
प्लॅटफॉर्म स्क्रिन डोअर्स (पीएसडी) ही मोटरव्दारे उघड बंद होणाऱ्या सरकत्या दरवाजांची अत्याधुनिक प्रणाली आहे. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्म्सचं संरक्षण करण्यासाठी आणि मेट्रोमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली फार उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्तींनाही मेट्रोत सहज येता यावं म्हणून असे सरकते दरवाजे फार उपुयक्त आहेत.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Nagpur: ठेका संपला, रोजी विसरा!१७ कामगारांना रोजंदारी देण्यास नकार

दरम्यान, मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचे मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आरााखड्याची पाहणी केली. मेट्रो स्टेशवर स्वतः मेट्रोचे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोगरा मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास केला.

"मुंबई 1" मोबाईल अॅप :

या ॲपमध्ये प्रवाशांसाठी मेट्रो संबधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे आहेत तिथे असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन पॉइंटवरून प्रवाशांना प्रवेश करता यावा यासाठी मोबाईल फोनवर हा ॲप एक क्यूआर कोड तयार करतो.

एनसीएमसी कार्ड -
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे सुरूवातीला एमएमआरडीव्दारे चालवण्यात येणा-या मेट्रो कार्डवरती वापरल जाणार आहे. नंतर हळूहळू ही सुविधा लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतुकीच्या इतर पर्यायांसाठी विस्तारीत करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारासाठी या कार्डमध्ये १०० रूपये ते दोन हजार रूपयापर्यंत या कार्डला रिचार्ज करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com