MSRTC: एसटीचा क्रांतिकारी निर्णय; 5 हजार ई-बसेससाठी निघाले टेंडर

E Bus
E BusTendernama

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) तब्बल ५,१५० इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी टेंडर (E Bus Tender) प्रसिद्ध केले आहे. टेंडर सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

E Bus
CS: सातारा - देवळाईकरांच्या रस्त्यांची कोणी लागली वाट?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक अलीकडेच पार पडली. या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५०  इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या बैठकीत दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकुलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकीटदर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

E Bus
Nashik : उद्योगमंत्र्यांच्या आश्‍वासनाने एमआयडीसीचे अधिकारी अडचणीत

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्वमालकीच्या, भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा 15 हजार 877 बसगाड्या आहेत. त्यापैकी सुमारे 4500 बसगाड्या नादुरुस्त झालेल्या आहेत. प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीने काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकुलित बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या.

२०१७ मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली, त्यानंतर राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीने गेल्यावर्षी 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण केले आहे. पहिल्या टप्प्यात 150 'शिवाई' बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.

टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीशी 50 व ऑलेक्ट्रा ग्रीनटेक (इवे ट्रान्स) कंपनीशी 100 बसगाड्यांचा भाडेकरार झाला आहे. यापैकी काही ई-बस ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. उर्वरित बसगाड्या लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

E Bus
Pune: PMRDA क्षेत्रासाठी पीएमपीची गुड न्यूज! 'या' 3 ठिकाणी लवकरच..

ई-बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलित व आवाज विरहित आहेत. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. गेल्या वर्षात शासनाने २ हजार  ६०० कोटींची मदत केली. त्यापार्श्वभूमीवर ई-बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

एसटीच्या टेंडरनुसार येत्या काही काळात तब्बल ५,१५० ई-बस नव्याने महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. १२ मीटर आणि ९ मीटर अशा दोन प्रकारात या बसगाड्या आहेत. महामंडळाने या बस पुरवठ्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले असून इच्छूक कंपन्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यापैकी १५० गाड्या चालू वर्षात तर उर्वरित ५००० गाड्या पुढील वर्षात पुरवठा करायच्या आहेत

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com