MMRDA : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 100 कोटींचे टेंडर

अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी
Garbage Project
Garbage ProjectTendernama

मुंबई (Mumbai) : अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर येथील कचऱ्याच्या शास्त्रोक्त आणि योग्य विल्हेवाटीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) प्रादेशिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार आहे. सुमारे १०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी टेंडर प्रसिद्ध झाले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे.

Garbage Project
Mumbai : वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड; 2 महिन्यात 9000 कोटीचे टेंडर

'एमएमआरडीए'ने अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुळात मुंबई महानगर प्रदेशातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांनी रखडलेला हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. ही टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच पहिल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात येईल अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

Garbage Project
Railway : कल्याण-मुरबाड रेल्वेला ग्रीन सिग्नल; 1000 कोटींचे टेंडर

बदलापूर, अंबरनाथ, कुळगाव आणि उल्हासनगर क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अंबरनाथ येथे अंदाजे ५० एकर जागेवर सामाईक भरावभूमी विकसित करणे आणि ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे अशी कामे या प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहेत. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जावी आणि हे करताना पर्यावरणाला धक्का पोहोचू नये, प्रदूषण होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अशा या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आयुक्त श्रीनिवास यांनी दिली. तसेच हा पहिला प्रादेशिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असेल पुढे 'एमएमआर' परिसरात असे आणखी प्रकल्प उभे करून तेथील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com