विधीमंडळ अधिवेशन : गोरेगाव झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागेत

uday samant
uday samanttendernama
Published on

मुंबई (Mumbai) : गोरेगाव येथील भगतसिंगनगर येथे मुंबई सागरी किनारा प्रकल्पातील उड्डाणपुलामुळे तेथील झोपडीधारक रहिवाशांचे त्याच ठिकाणी किंवा जवळपासच्या परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे.

uday samant
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले; राज्याचा विकासाचा दर 7.3 टक्के अपेक्षित

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पुनर्वसन प्रकल्पासाठी खासगी विकासकाची निवड करण्यात आली होती. हा प्रकल्प विकासक पूर्ण करू शकला नसल्याने येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन रखडलेले आहे. हे पुनर्वसन पुन्हा त्याच जागेत करण्यासाठी विकासकासोबत चर्चा करून यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य विद्या ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेमध्ये सदस्य योगेश सागर, सना मलिक यांनी सहभाग घेतला.

uday samant
Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील 14 हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार

मंत्री सामंत म्हणाले, या पुलाच्या मार्गरेषेत पाया व पोहोच रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या खासगी जागेवरील ५४० झोपडीधारकांचे पूनर्वसन करण्याकरित्ता व पर्यायी जागेकरिता घरे उपलब्ध करुन देण्याकरिता बृहन्मुंबई महापालिकेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्यात येत असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आलेल्या वर्सोवा-दहीसर-भाईंदर या किनारी रस्त्याचा पूल हा महत्वाचा भाग आहे. याकरिता बाधित होणाऱ्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात पूर्ण काळजी घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com