'या' ठिकाणी सर्वात मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र होणार; राज्य सरकार 1700 कोटी खर्च करणार

Uday Samant
Uday SamantTendernama

मुंबई (Mumbai) : देशातील सर्वात मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र आणि पंचतारांकित हॉटेल कळंबोली येथे होत असून त्यासाठी राज्य सरकार १७०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मंत्री सामंत यांच्या हस्ते पनवेल महापालिकेच्या ६१० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले.

Uday Samant
Samruddhi Mahamarg : तिसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला; तब्बल दीड तास वाचणार

या कार्यक्रमात पनवेल कळंबोली, जुई, कामोठे, खारघर, बेलपाडा, रोडपाली येथे अमृत अभियानातून जलकुंभ बांधणे व जलवाहिन्या अंथरणे, तसेच याच परिसरात मलवाहिन्या अंथरणे, पनवेल शहरात ५.५० दश लक्ष लिटर क्षमतेचे मलनिःस्सारण केंद्र बांधणे, कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे, कळंबोलीतील शीव पनवेल महामार्ग ते केएलई महाविद्यालय, सेक्टर १ ते सेक्टर १२ (रोडपाली तलाव) रस्त्याचे उन्नतीकरण करणे, कळंबोलीतील सेक्टर १ ते तळोजा लिंकरोड, सेक्टर १० येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण, खारघर वसाहतीमधील लिटीलवर्ल्ड मॉल ते उत्सव चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासोबत इतर रस्ते डांबरीकरण करणे.

Uday Samant
Eknath Shinde : मोठी बातमी! सरकारने का कमी केला टेंडर प्रक्रियेचा कालावधी?

कर्नाळा स्पोर्टस अकादमीसमोरील रस्ता उन्नतीकरण व काँक्रीटीकरण करणे, बेलपाडा येथील अंडरपास ते निफ्ट महाविद्यालय रस्त्याचे काँक्रीटीकरण, बेलपाडा मेट्रो स्थानक गणेश मंदीर ते उत्सवचौक काँक्रीटीकरण व इतर कामे, पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्ग ते मित्रानंद सोसायटीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नवीन पनवेल उपनगरातील सेक्टर १ व एचडीएफसी चौकाचे काँक्रीटीकरण करणे या कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com