Nitesh Rane
Nitesh RaneTendernama

Nitesh Rane : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथे 350 कोटींच्या कामांना मान्यता

Published on

मुंबई (Mumbai) : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल. या बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतेने पूर्ण करा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले.

Nitesh Rane
पाचाडमध्ये शिवसृष्टी निर्मितीचा 50 कोटींचा आराखडा तयार; लवकरच काम सुरू होणार

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव जकाते, सह आयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती घेतली.

Nitesh Rane
Mumbai : BMC चा महत्त्वाकांक्षी निर्णय; दक्षिण मुंबईला 'या' भागाला पुन्हा मिळणार 'हेरिटेज लूक'

येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, वर्कशॉप, मासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेड, प्रसाधनगृह यांसह विविध काम केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी ससून गोदी मच्छीमार बंदर येथील विकास कामांसाठी 92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, आनंदवाडी येथील विकासकामांसाठी 88 कोटी 44 लाख रुपये, मिरकरवाडा येथील विकासकामांसाठी 26 कोटी 23 लक्ष रुपये, कारंजा येथील विकासकामांसाठी 149 कोटी 80 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील सात ठिकाणी होत असलेल्या मासे उतरवणी केंद्रातील कामांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ यांची घोषणा राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये केली आहे. यासाठी मुंबई व नागपूर येथील कार्यालयातील सध्याच्या कार्यरत यंत्रणेमार्फत काम केले जावे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्री राणे यांनी यावेळी दिले.

Tendernama
www.tendernama.com