Mumbai : BMC चा महत्त्वाकांक्षी निर्णय; दक्षिण मुंबईला 'या' भागाला पुन्हा मिळणार 'हेरिटेज लूक'

bmc
bmcTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिकेने (BMC) दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. नरिमन पॉईंट, फोर्ट, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड, ग्रँट रोड, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल परिसर, काळा घोडा आणि आसपासच्या परिसराला पुन्हा एकदा 'हेरिटेज लूक' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे मुंबईला पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्याचा पालिकेचा मानस आहे. या कामाची टेंडर (Tender) प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, दिवाळीपूर्वी या कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे.

bmc
Mumbai : बीकेसी भूखंड लिलावातून एमएमआरडीएला 3,840 कोटी, 15,000 नवीन नोकऱ्यांची शक्यता

या प्रकल्पामध्ये टप्प्याटप्प्याने कामे सुरू झाली आहेत. इमारतींना साजेसे पदपथ बांधले जात असून, हेरिटेज स्ट्रीट लाईट्सची उभारणी केली जात आहे. मुंबई महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील ब्रिटिशकालीन इमारती, ज्या १०० ते १५० वर्षांहून अधिक जुन्या आहेत, त्यांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या ५० वर्षांत विकासकामांच्या नावाखाली बदललेले पदपथाचे जुने दगड आणि स्ट्रीट लाईट्स बदलून त्यांना मूळ रूपात आणले जाणार आहे.

या कामांमध्ये प्रामुख्याने मालाड दगडाचा वापर करून पदपथ बांधणे, पदपथावर दगडी लाह्या (पेव्हिंग स्टोन्स) वापरणे, वाहतूक बेटांचा विकास करणे, हेरिटेज स्ट्रीट लाईट्स बसवणे, इमारतींना साजेसे रंगकाम करणे आणि इतर संबंधित कामे यांचा समावेश आहे.

सीएसएमटी आणि मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण यापूर्वीच करण्यात आले असून, चर्चगेट ते चर्नी रोडकडे जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडवरील पदपथ आणि हेरिटेज लूक असलेल्या स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर दक्षिण मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हेरिटेज लूक असणाऱ्या स्ट्रीट लाईट्स आणि दगडी पदपथ तयार केले जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

bmc
Pune : हिंजवजी IT पार्क का गेला पाण्याखाली? चूक नक्की कोणाची?

शहर आणि उपनगरातील जुन्या लोखंडी बस स्टॉप आणि बस थांब्यांचे रूपडे बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १०० बस स्टॉप नावीन्यपूर्ण पद्धतीने बदलण्यात येणार असून, ही कामे मुंबई महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केली जातील.

याचबरोबर, दक्षिण मुंबईतील फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'फॅशन स्ट्रीट'लाही हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. यामध्ये हेरिटेज स्ट्रीट लाईट्स, दगडी पदपथ, एकसमान स्टॉल्स आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास यांचा समावेश आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, दिवाळीपूर्वी या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे दक्षिण मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल, तसेच पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना पूर्वीच्या मुंबईचा अनुभव घेता येईल, अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com