Mumbai : MUTP प्रकल्पांना 1100 कोटी; अनेक प्रकल्प लागणार मार्गी

Railway
RailwayTendernama

मुंबई (Mumbai) : आगामी बृहन्मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुका लक्षात घेऊन मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी वित्तमंत्री निर्मला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. गेल्या अर्थसंकल्पात एमयूटीपी प्रकल्पांकरिता ५७५ कोटींचा निधी मिळाला होता.

Railway
Ashwini Vaishnav: महाराष्ट्रातील 'या' नेत्यामुळे रखडली बुलेट ट्रेन

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. निर्मला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी २, एमयूटीपी ३ आणि ३ ए करिता निधी मंजूर केला आहे. एमयूटीपी २ साठी १५० कोटी, एमयूटीपी ३ करता ६५० कोटी तर एमयूटीपी ३ ए मधील प्रकल्पांसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या रक्कमेऐवढी रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. त्यामुळे एमयूटीपीच्या प्रकल्पाला २२०० कोटी रुपये यंदा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू करणे एमआरव्हीसीला शक्य होणार आहे. 

Railway
Mumbai : हवा शुद्धीकरणासाठी 5 एअर प्युरिफायर; 10 कोटी खर्च

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प जाहीर न करता सुरु असलेल्या, रखडलेल्या किंवा याआधी परवानगी मिळालेल्या प्रकल्पांना निधी देण्यास प्राधान्य दिले आहे. निधी अभावी अनेक प्रकल्पांचे काम रेंगाळले होते. एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयूटीपीच्या प्रकल्पांना २६०० कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार एमयूटीपीच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

Railway
BAMU : ॲथेलेटीक सिंथेटिक ट्रॅक प्रकरणी टेंडर विभागाची मेहरबानी

रेल्वे मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अनुदानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 91 टक्के अधिक निधी दिला आहे. त्यामुळे  एमयूटीपी प्रकल्पांना आणखी गती मिळणार आहे. जेथे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे अशा कामांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि एमयूटीपी 3 ए  प्रकल्पांमधील भूसंपादन प्रक्रियाही जोमाने सुरू केली जाईल.
- सुभाष चंद गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी.

Railway
Ambarnath : शिवमंदिर सुशोभीकरणासाठी 125 कोटींचे टेंडर

अशी होणार कामे -
एमयुटीपी २- १५० कोटी
मुंबई सेंट्रल ते बोरीवली ६ वा मार्ग, सीएसएमटी ते कुर्ला ५ व ६ वा मार्ग.

एमयूटीपी ३- ६५० कोटी
विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल गाड्या

एमयूटीपी ३ ए - ३०० कोटी
सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाड्या, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com