Ambarnath : शिवमंदिर सुशोभीकरणासाठी 125 कोटींचे टेंडर

Shiv Temple
Shiv TempleTendernama

मुंबई (Mumbai) : अंबरनाथचा (Ambarnath) प्राचीन वारसा आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या शिवमंदिराच्या परिसराचे रूप लवकरच पालटणार आहे. अखेर भारतीय पुरातत्व खात्याने नुकतीच शिव मंदिर परिसरातील १०० मीटर अंतरावरील सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे आराखड्यातील कामांची टेंडर प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात १२५ कोटींच्या कामांना गती मिळणार असल्याने शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्प मार्गी लागणार आहे.

Shiv Temple
Ashwini Vaishnav: महाराष्ट्रातील 'या' नेत्यामुळे रखडली बुलेट ट्रेन

मुंबई महानगर प्रदेशात शिलाहार काळात उभारण्यात आलेले आणि अजूनही सुस्थितीत असलेले एकमेव शिव मंदिर अंबरनाथ शहरात आहे. स्थापत्य वास्तूकलेचा एक उत्तम नमुना या मंदिराच्या रुपाने पाहता येतो. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला मोठे महत्व आहे. वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या या मंदिराचे आणि परिसराचे रूप पालटण्यासाठी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी येथे शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचेही आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवमंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठीचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला होता. मात्र या कामासाठी भारतीय पुरातत्व खात्याची पूर्वपरवानगी आवश्यक होती.

Shiv Temple
Mumbai: पुणे, सातारा, सोलापूरसाठी राज्य सरकारची गुड न्यूज

अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने खात्याशी तसा पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र अनेक महिने यावर निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने नुकतीच शिव मंदिर परिसरातील १०० मीटर अंतरावरील सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे आराखड्यातील कामांच्या टेंडर प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण १३८ कोटींच्या या आराखड्यातील पहिल्या टप्प्यात १२५ कोटींच्या कामांना गती मिळणार असल्याने शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्प मार्गी लागणार आहे.

Shiv Temple
Express way : दिल्ली-मुंबई ई-वेच्या पहिल्या टप्प्याचा ठरला मुहूर्त

याअंतर्गत शिव मंदिर ज्या वालधुनी नदीच्या किनारी वसले आहे, त्या नदीचा काठ घाट स्वरुपात विकसित केला जाणार आहे. त्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सोबतच भक्तनिवासाचीही उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ६ कोटी रुपयांच्या खर्चातून ऍम्पी थिएटर, सोबतच प्रदर्शन गृह, कुंडांचे सुशोभीकरणही केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com