Jaikumar Gore : वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट; जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने

Gharkul Yojana
Gharkul YojanaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली.

Gharkul Yojana
राज्यातील 5 हजार महिलांना मिळणार पिंक रिक्षा; तातडीने कार्यवाहीच्या आदिती तटकरे यांच्या सूचना

घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने करा -
ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले की, देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने होण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अधिक पारदर्शकतेने आणि गतिमानतेने अमंलबजावणी करावी. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाले आहे.  सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेने सुरू करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाही, बांधायला जागा नाही असे लाभार्थी प्रथम प्राधान्याने घ्यावे. तसेच जागा असलेल्या मात्र घर नसलेल्या लाभार्थीची स्वतंत्र यादी करावी, असे सूचित करुन श्री.गोरे यांनी सांगितले की, घरकुल मंजूरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गावागावांत ग्राम सभांमध्ये याबाबत माहिती द्यावी.

घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावा -
मंत्री श्री. गोरे म्हणाले, घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी. जेणेकरून गावातील सर्वांना घरकूल लाभार्थ्यांची माहिती होईल. त्याचप्रमाणे घरकुलाचे हप्ते सर्व लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहचवावेत. सर्वेक्षण करताना प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम करावे. कोकण पट्ट्यात गावातील गावठाण जमिनी घरकूल योजनेसाठी वापराव्यात. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गतही घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे.
             
ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे. त्यात  ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी सर्व गटांची सक्रियता वाढविण्यावर यंत्रणानी अधिक लक्ष द्यावे. हे सर्व गट सक्रिय होण्यासाठी समन्वयपूर्वक कार्यपद्धती स्वीकारुन कामांची गती वाढवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी  प्रभाग संघाना भेटी द्याव्यात. विभागांतर्गत विविध  योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री गोरे यांनी यावेळी दिल्या.

Gharkul Yojana
Mumbai : 'मुंबई उपनगर' डीपीडीसीत 943 कोटींचा आराखडा मंजूर; झोपडपट्ट्यांमध्ये सुविधांसाठी 253 कोटींची वाढीव मागणी

स्थळ पाहणी वेळेत करा -
ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष द्यावे, असे सूचित करुन सांगितले की, कामांची वेळेत आणि दर्जेदार पूर्तता होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा. स्थळ पाहणी वेळेत करावी. हप्ता वितरित केल्यावर घरकुलाच्या सुरु केलेल्या कामाची नोंदणी व्यवस्थित ठेवावी. कामाच्या टप्पानिहाय विहित केल्यानुसार लाभार्थ्यांना हप्ते द्यावे. विभागांर्तगत बचतगटांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिक संख्यने ते कार्यरत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणाप्रमुखांनी त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. ग्रामविकास विभागाच्या लखपती दिदी योजनेसह इतर सर्व योजनांची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे निर्देश कदम यांनी दिले.

ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान यासह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com