म्हाडाची बंपर लॉटरी; मुंबईसह राज्यात तब्बल 13 हजार घरे बांधणार

MHADA
MHADATendernama

मुंबई (Mumbai) : नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगरसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत म्हाडा घरे उभारणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे १२ ते १३ हजार घरांची निर्मिती होणार आहे.

MHADA
Mumbai Metro News : मुंबई मेट्रोची 'ही' स्थानके होणार हिरवीगार; 3 ठेकेदार लावणार तब्बल 32,600 झाडे

म्हाडा मुंबईतही ३६०० घरे बांधणार असून विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी ही घरे उपलब्ध होणार आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांसाठी ३६०० घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. यामध्ये मुंबईतील पवई, मागाठाणे, कन्नमवार नगर, पहाडी गोरेगाव, अॅन्टॉप हिल या ठिकाणी ही घरे असणार आहेत. मागील वर्षी म्हाडाने ऑगस्ट महिन्यात ४०८२ घरांसाठी मुंबईत लॉटरी काढली होती. ४०८२ घरे उपलब्ध असताना या घरांसाठी तब्बल १ लाख २२ हजार अर्ज आले होते. आता ३६०० घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे.

MHADA
Mumbai News : मुंबईकरांसाठी आली चांगली बातमी; 'ते' पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगरसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांतदेखील म्हाडा घरे उभारणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे १२ ते १३ हजार घरांची निर्मिती होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com