Mantralaya 2.0 : सुसज्ज 7 मजली नवीन इमारत बांधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले
Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीच्या उभारणी कामाची सुरवात तातडीने करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

Mantralaya
पुणे-नाशिक आता रेल्वेकडून सेमी हायस्पीड प्रकल्प; डीपीआर सर्वेक्षणाला सुरवात

सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. काम तत्परतेने पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे काम ही तातडीने पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीच्या उभारणी कामाची सुरवात करण्यात यावी, असेही निर्देश फडणवीस यांनी दिले.

Mantralaya
Shaktipeeth Mahamarg : 'तो' पुन्हा आला!; 'शक्तीपीठ' महामार्गाला मुख्यमंत्र्यांचा बूस्टर

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडली जाणे आवश्यक असून, त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी. विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारूप तयार करावे. रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करून रस्त्याचे काम बीओटी तत्वावर करण्याचे धोरण स्वीकारावे.

विविध विभागांच्या बांधकामांसंदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या बांधकामासाठीचा  स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Mantralaya
Mumbai : मुंबई महापालिकेचा सरकारी धोरणाला हरताळ; तब्बल 22 हजार कोटींचे प्रकल्प...

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतीमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असण्यावर, प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती देताना कार्यक्षमता, गुणवत्ता, पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार असून विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती दिली.

बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com