Mumbai: राज्यातील कारागृह पुनर्विकास, आधुनिकीकरण प्रकल्पांना गती

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती
Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी   गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

Mantralaya
PWDचा पुढील 20 वर्षांचा विकास आराखडा तयार करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ मे २०२६ रोजी आयोजित कारागृहाबाबत आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अनुपालनाबाबत मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नागपूर, वर्धा आणि मुंबई मध्यवर्ती कारागृहांच्या स्थलांतर व पुनर्विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मानखुर्द येथे आधुनिक बहुमजली कारागृहाचे बांधकाम आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने, मंडाले येथे कारागृह मुख्यालयाची प्रशासकीय इमारत, मड बेट (दारवली, ता. बोरिवली) येथे उच्च सुरक्षा कारागृह, प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय निवासस्थाने, मुंबई मध्यवर्ती कारागृहाचा पुनर्विकास करून कारागृह व शासकीय निवासस्थाने उभारणे, नागपूर मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करून नियोजित जागेवर नवीन मध्यवर्ती, जिल्हा व खुले कारागृह; तसेच शासकीय निवासस्थाने, वर्धा जिल्हा कारागृह स्थलांतरित करून नियोजित जागेवर नवीन वर्धा मध्यवर्ती कारागृह व शासकीय निवासस्थाने बांधणे इत्यादी कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

Mantralaya
महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामांबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांच्या कामकाजाच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. राज्यातील कारागृह व्यवस्थेचे आधुनिकीकरण, बंदी क्षमता वाढविणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी नमूद केले.

बैठकीस एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, कारागृहे व सुधारसेवाचे महासंचालक सुहास वारके, गृह विभाग (तुरुंग)चे सहसचिव सुग्रीव धपाटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com