Mumbai : महानिर्मिती; 600 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या टेंडरला मुदतवाढ

Solar Power
Solar PowerTendernama

मुंबई (Mumbai) : सध्या सर्वच वीज कंपन्यांकडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात असला तरी महानिर्मितीच्या सौर प्रकल्पासाठी मात्र जमीन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सहाशे मेगावाॅटच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सुमारे तीन हजार एकर जमीन मिळत नसल्याने महानिर्मितीने इच्छुक कंपन्यांना टेंडर भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

Solar Power
Mumbai News : मुंबईकरांसाठी आली चांगली बातमी; 'ते' पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

काेळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांच्या तुलनेत सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणारी वीज महागडी ठरत आहे. तसेच औष्णिक वीज प्रकल्पातून वीज निर्मिती करताना कोळसा जाळावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकार सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्रोत्साहन देत आहे. त्यानुसार महानिर्मितीने नुकत्याच सहाशे मेगावाॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज पुरवठा करण्यासाठी इच्छुक कंपन्याकडून २८ मे अखेर टेंडर मागितली होती.

Solar Power
Mumbai : महापालिकेचा 'तो' महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुसाट; सर्व अडथळे दूर

या प्रकल्पासाठी संबंधित कंपन्यांनी जमिनीचा शोध घेणे अवश्यक आहे. मात्र त्यांना टेंडर सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पुरेशी जमीन उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सौर प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर दाखल झाली नव्हती. त्याची दखल घेत महानिर्मितीने संबंधित कंपन्यांना टेंडर सादर करण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती महानिर्मितीतील उच्चपदस्थांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com