Eknath Shinde : राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण; 223 कोटी खर्च

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात आले असून, या २२३ कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Eknath Shinde
Mumbai : बहुचर्चित गोखले पुलाची एक लेन आजपासून खुली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि समर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आदी उपस्थित होते .

Eknath Shinde
Mumbai : बेस्टच्या 2400 ई-बसचे टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात; 4 हजार कोटी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्प इन्फ्रास्ट्रक्चर मिशन" (पीएम-अभिम ) अंतर्गत  खालील आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि समर्पण करण्यात आले.
पीएम-अभिम अंतर्गत १३५.०५ कोटी रुपये खर्चाच्या  क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक कामाचे भूमिपूजन झाले.
यामध्ये जिल्हा रुग्णालय, जि. पुणे - १०० खाटा,
जिल्हा रुग्णालय, जि. अहमदनगर ५० खाटा,
जिल्हा रुग्णालय, जि. बुलढाणा - ५० खाटा,
जिल्हा रुग्णालय, जि. बीड - ५० खाटा,
आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार - ५० खाटा समावेश आहे.

तसेच पीएम-अभिम अंतर्गत. १.२५ कोटी रुपये खर्चाच्या इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब जिल्हा रुग्णालय, जि. अमरावती भूमिपूजन झाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण  ७७.९४ कोटी रुपये खर्चाच्या खालील आरोग्य सुविधांचे लोकार्पण झाले.

- मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर - प्रा. आ. केंद्र, करजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती

- मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, जैताने ता. साक्री जि. धुळे

- मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्र, शिराळा ता. अमरावती जि. अमरावती

- जिल्हा वेअरहाऊस, मिटींग, डीपीएमए ऑफिस, जि. चंद्रपूर

- स्टाफ क्वार्टर - प्रा.आ.केंद्र, ताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर

- मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्र, गव्हाळी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार

- मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सावदा ता. रावेर जि. जळगाव

- मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, किनगाव ता. यावल जि. जळगाव

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत एकूण 8.99 कोटी रुपये खर्चाच्या पुणे येथील नवीन आयुष रुग्णालय इमारतीचे लोकार्पण झाले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com