Mumbai : गणेशोत्सवापूर्वी दक्षिण मुंबईतील 'हा' महत्त्वाचा पूल होणार खुला

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : गेली पाच वर्षे रखडलेल्या लोअर परळ उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाला आले असून येत्या महिनाभरात गणेशोत्सवापर्यंत हा पूल वाहनांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.

Mumbai
PM आवास घोटाळा; जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे 'गिरे तो भी टांग ऊपर'

वरळी, डिलाईल रोड, करी रोड आणि लोअर परळला जोडणारा लोअर परळचा उड्डाणपूल आयआयटी, मुंबईने धोकादायक असल्याचा अहवाल दिल्यानंतर 2018 मध्ये तोडण्यात आला. दोन ते तीन वर्षांत हा पूल पूर्णपणे बांधून तयार होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे तसेच पश्चिम रेल्वेकडून विविध परवानग्या मिळण्यासाठी झालेल्या विलंबामुळे हा पूल तब्बल पाच वर्षे रखडला.

Mumbai
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमागे 'लेडी डॉन'चा कहर

उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या कामात मोठा फरक आहे. उड्डाणपुलाचे काम हे मजबूत आणि टिकाऊ असते. हा पूल किमान 100 ते 150 वर्षे टिकला पाहिजे असा बांधण्यात येत आहे. रोड आणि मुख्य म्हणजे क्राँक्रीटीकरणासाठी पावसाळा योग्य नाही. क्राँक्रीटीकरणासाठी कोरडे दिवस लागतात. बाहेरचे तापमानही योग्य लागते. संपूर्ण पुलावरील रोड आणि क्राँक्रीटीकरणासाठी कमीत कमी 30 दिवस लागणार आहेत. त्यामुळे पाऊस नसताना कोरड्या दिवसांत दुप्पट वेगाने काम करून हा पूल सर्वांसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महापालिका पूल विभागातील वरिष्ठांनी दिली. या पुलाची लोअर परळ ते वरळीच्या दिशेने जाणारी मार्गिका मे महिन्यात वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. रखडलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि स्थानिक रहिवाशांसह वाहनचालकांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री आणि मुंबई महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com