'त्या' ठेकेदारांना आरोग्यमंत्र्यांचा सज्जड दम; गैरप्रकार आढळल्यास...

Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): आरोग्य विभागात बाह्य स्त्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) सेवा देणाऱ्या संस्थांच्या कामकाजात कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे, प्रसंगी काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

Mantralaya
Prakash Abitkar : महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करणार

सार्वजनिक आरोग्य विभागात सिटीस्कॅन, एमआरआय, डायलेसिस, स्टेमी, एक्स रे, रक्त तपासण्या (एचएसएल), आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८, १०२, १०८, मनुष्यबळ पुरवठा, आहार पुरवठा, स्वच्छता सेवा, तांत्रिक सहाय्य, देखभाल-दुरुस्ती,वाहन पुरवठा यासारख्या अनेक सेवा बाह्य (खासगी) यंत्रणेद्वारे दिल्या जातात.

बाह्य स्त्रोतांद्वारे संलग्नित संस्थांनी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिले पाहिजे, रुग्णांना सकस आहारपुरवठा, स्वछता सेवा यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन होत असल्याबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तपासणी करावी.

पंधरा दिवसात त्याबाबतच्या अहवाल सादर करावा. अहवालात दोषी आढळल्यास संबंधित संस्थांची बिले थांबवावीत. तसेच त्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.  

Mantralaya
Tender Scam: साडेतीन कोटींच्या आयसीयू टेंडर घोटाळ्यात कोणाला झाली अटक?

आबिटकर म्हणाले, संस्थांनी सेवा देताना गुणवत्ता, पारदर्शकता आणि विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या संस्थांची नियमित तपासणी व मूल्यांकन करावे. करारातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरोधात दंडात्मक कारवाई, करार रद्द करणे, तसेच आवश्यक असल्यास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी.

बाह्य संस्थांमार्फत कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन, यासह सर्व बाबींची काटेकोर तपासणी करावी, या कामात कुचराई करणाऱ्या व चुकीचे काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Mantralaya
Exclusive: 105 कोटींचा महा-घोटाळा; आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर! मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

बाह्य स्त्रोत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही आबिटकर यांनी दिले.

बैठकीत राज्यभर सुरू असलेल्या सिकल सेल ॲनिमिया, हत्तीरोग, क्षयरोग, मलेरिया रोग तपासणी व निर्मूलन मोहीम, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांचा आढावा व सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. सामान्य नागरिकाला सरकारी दवाखाना हाच आधार आहे याची जाणीव ठेवून रुग्णांना चांगली वर्तणूक, व आरोग्य सेवा देण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी आरोग्य संचालक, उपसंचालक उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com