सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गुड न्यूज! 161 कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला नव्या कृषिमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Datta Bharne
Datta BharneTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Datta Bharne
$1 Trillion Economy: फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाला बूस्टर; राज्यात 34 हजार कोटींच्या...

मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत कृषिमंत्री भरणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, कृषी विभागाचे प्रधानसचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Datta Bharne
तगादा : भिवंडीतील वाहतूक नियोजन फसले; आता काय होतेय मागणी?

कृषिमंत्री भरणे म्हणाले की, मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या भागात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याची सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मांडली आहे. या महाविद्यालयाच्या बांधकाम तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी १६१ कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा. शासनाच्या सर्व मान्यता घेवून इमारत बांधकाम, मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाच्या कामांना गती देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.

Datta Bharne
जागतिक दर्जाचे बर्ड पार्क पाहायला आता विदेशी जाण्याची गरज नाही, कारण...

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्‍य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून या विद्यापीठाची इमारत बांधकाम, विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com