गडचिरोलीत १८६ एकरांवर होणार गोंडवाना विद्यापीठाचा विकास; १,१०० कोटींचा आराखडा

अत्याधुनिक शैक्षणिक व संशोधन सुविधा, प्रशासकीय इमारत आणि वसतिगृहांचा समावेश; केंद्र व राज्य शासनाकडून आतापर्यंत १५७ कोटी रुपये मंजूर
देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai): गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा नवीन परिसर १८६ एकर जागेवर विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक व संशोधन सुविधा उभारताना गोंड वास्तुकलेचा वारसा आणि आधुनिक शैलीचा संगम साधून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन परिसर विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस
Nashik ZP: जिल्हा परिषेदच्या सूपर 50 उपक्रमातून फसवणूक; सेसमधून 6 कोटी खर्च

गोंडवाना विद्यापीठासाठी शैक्षणिक संकुल, प्रशासकीय इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील आणि राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक परिसर असलेल्या इमारतींचा अभ्यास करून त्यानुसार विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट परिसर विकसित करण्याच्या सूचना दिल्या.

गडचिरोली परिसरात औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण होत असताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांनाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विद्यापीठ परिसरात निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यापीठाची इमारत गोंड वास्तुकलेचा वारसा जपत आधुनिक शैलीशी सुसंगत असावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठासाठी उपलब्ध झालेल्या १८६ एकर जागेत सुमारे २७ लाख चौरस फूट क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. हा परिसर शैक्षणिक आणि संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या १,१०० कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी केंद्र व राज्य शासनाकडून १५७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस
Nashik ZP: जिल्हा परिषेदच्या सूपर 50 उपक्रमातून फसवणूक; सेसमधून 6 कोटी खर्च

परिसर विकसित करताना पर्यावरणपूरक आणि हरित इमारती उभारण्यावरही भर दिला जाणार आहे. ऊर्जा बचतीसह विविध २७ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक इमारती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण, औषधी उद्यान आणि पाण्याच्या साठवणुकीसाठी कृत्रिम पानवठ्यांची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे.

परिसरातील निसर्गाशी एकरूप होणारी तसेच अत्याधुनिक सुविधांनी युक्त इमारत उभारावी, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून परिसरातील सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि संशोधनाच्या गरजा लक्षात घेऊन इमारतींची रचना करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्य अभियंता संभाजी माने यांनी सांगितले.

विद्यापीठ परिसराच्या वास्तुशैलीचा अभ्यास करून त्यानुसार मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. सहा कोटी लिटर पाणी साठवण क्षमता, पर्यावरणपूरक सुविधा आणि विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस
गडचिरोलीतील पुलांसाठी स्वतंत्र पॅकेज; मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी करणार

Key Points

  • गोंडवाना विद्यापीठाचा १८६ एकर जागेवर नवीन परिसर विकसित होणार,

  • विद्यापीठाच्या विकासासाठी १,१०० कोटी रुपयांचा आराखडा तयार,

  • केंद्र व राज्य शासनाकडून १५७ कोटी रुपये मंजूर,

  • शैक्षणिक संकुल, प्रशासकीय इमारत आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा समावेश,

  • गोंड वास्तुकला आणि आधुनिक शैलीचा संगम साधण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश,

  • २७ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक इमारती आणि संशोधन सुविधांचे नियोजन,

  • पर्यावरणपूरक हरित इमारती, ऊर्जा बचत, औषधी उद्यान आणि सहा कोटी लिटर पाणी साठवणुकीची सुविधा.

Tendernama
www.tendernama.com