शिवडी टू एलिफंटा 'रोप वे'ची रखडपट्टी; खर्चात ३०० कोटींची वाढ

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : जगातील सर्वात मोठा मुंबईतील शिवडी (Shivdi) ते एलिफंटा (Elephanta) बेटाला जोडणारा समुद्रावरील रोप-वे प्रकल्प अडचणीत सापडलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला हिरवा कंदील न दिल्याने हा प्रकल्प रखडला आहे. परिणामी या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून ७०० कोटी खर्चाचा हा प्रकल्प आता १ हजार कोटींच्या घरात गेला आहे.

Mumbai
मुंबई महापालिकेचे 294 कोटींचे 'ते' वादग्रस्त टेंडर रद्द!

मुंबईतील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी समुद्र आणि नदीकाठच्या शहरांमध्ये जलवाहतूक विकसित करण्यावर तत्कालीन केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरीं यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली होती. त्यातील मुंबई ते अलिबाग रोरो बोटी आणि मुंबई ते बेलापूर हायस्पीड वॉटर टॅक्सी सारखे प्रकल्प आज प्रत्यक्षात सुरूही झाले आहेत. मात्र मुंबईतील शिवडी ते एलिफंटा बेटाला जोडणारा 8 किलोमीटर असा समुद्रावरील रोप-वे प्रकल्प रखडला आहे. रोप-वे प्रकल्पामुळे मुंबई ते घारापुरी येथील एलिफंटा बेटापर्यंत आठ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी फक्त 14 मिनिटे लागतील. सध्या हेच अंतर बोटीने पार करण्यासाठी एक तास लागतो आहे. हा भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील पहिला समुद्रातील रोप-वे असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च तब्बल 700 कोटी रुपयांचा येणार आहे. मात्र, प्रकल्पाला उशीर होत असल्याने या प्रकल्पाचा खर्च एक हजार कोटींच्या घरात जाणार आहे.

Mumbai
मुंबई-नागपूर सुसाट; समृद्धीमुळे अंतर अवघे एवढ्या तासांवर

शिवडी ते एलिफंटा बेटापर्यंतच्या या रोप-वेसाठी समुद्रात 10 ते 12 टॉवर उभे केले जाणार आहेत. टॉवरची लांबी 50 ते 150 मीटरपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे हा रोप- वे झाल्यानंतर जहाज वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. या रोप-वे खालून जहाजांची वाहतूक करता येणार आहे. एलिफंटा लेणी मुंबईमधील समुद्राच्या दुसर्‍या किनार्‍यावर वसलेले आहे. 1987 मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तू ठिकाण म्हणून एलिफंटा लेणी घोषित करण्यात आले. एलिफंटा लेणी बघण्यासाठी साधारणतः दररोज चार ते पाच हजार पर्यटक येत असतात. मात्र, रोप-वे सुरू झाल्यानंतर एलिफंटा लेणी बघायला पर्यटकांची संख्या पाच हजार ते 12 हजारपर्यत पोहोचणार असल्याचा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai
मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सांगितले की, शिवडी ते एलिफंटा बेटाला जोडणार समुद्रावरील रोप- वे प्रकल्प पर्यटकांच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समुद्रावरून रोप-वे जाणार असल्याने आणि एलिफंटा जागतिक पुरातन वास्तू असल्याने सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. सध्या या प्रकल्पाला पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. या दोन्ही विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहितीही राजीव जलोटा यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com