Kalyan-Dombivali Municipal Corporation
Kalyan-Dombivali Municipal Corporationtendernama

Dombivli: साहित्य-कलेची पंढरी आता होणार 'क्रीडानगरी'

डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा होणार कायापालट
Published on

मुंबई (Mumbai): कल्याण-डोंबिवली ही साहित्याची आणि कलेची पंढरी म्हणून ओळखली जातेच, पण आता या शहराची ओळख बदलण्याच्या वाटेवर आहे. ज्या डोंबिवलीने राज्याला अनेक गुणवंत कलाकार दिले, तीच डोंबिवली आता देशाला ऑलिम्पिकविजेते खेळाडू देण्यास सज्ज होत आहे.

Kalyan-Dombivali Municipal Corporation
नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा कायापालट होणार असून, शहरात तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचे क्रीडा विश्व उभे राहणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दोन टप्प्यांत साकारल्या जाणाऱ्या या क्रीडा संकुलात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात एका भव्य बंदिस्त क्रीडा संकुलाची (इनडोअर कॉम्प्लेक्स) आणि ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाची उभारणी केली जाईल.

आजवर सरावासाठी मुंबई किंवा पुण्याकडे धाव घेणाऱ्या जलतरणपटूंना आता आपल्याच शहरात बाराशे पन्नास चौरस मीटरचा आंतरराष्ट्रीय मानकांचा जलतरण तलाव आणि चारशे चौरस मीटरचा खास डायव्हिंग पूल उपलब्ध होणार आहे.

Kalyan-Dombivali Municipal Corporation
Adani: मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अदानी समूहाला; तब्बल सतराशे कोटींचे कंत्राट

दुसऱ्या टप्प्यात एका भव्य प्रेक्षागाराची (स्टेडियम) उभारणी केली जाईल, ज्यामुळे भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे यजमानपद डोंबिवलीला भूषवता येईल. सुमारे पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या बहुमजली क्रीडा इमारतीमध्ये विविध खेळांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. यामध्ये व्यायामशाळा, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, जुडो, स्क्वॅश, स्नूकर आणि नेमबाजी केंद्र यांसारख्या खेळांचा समावेश आहे.

तसेच योगासने आणि जिम्नॅस्टिकसाठीही अद्ययावत दालने असतील. विशेष म्हणजे, शहरात भेडसावणारी पार्किंगची समस्या लक्षात घेऊन, या संकुलात सोळा हजार चौरस मीटरचे भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे.

Kalyan-Dombivali Municipal Corporation
समृद्धी महामार्गालगत 12 ड्रायपोर्ट उभारण्याची सरकारची तयारी

खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी आधुनिक भौतिकोपचार केंद्र (फिजिओथेरपी सेंटर) येथे असेल. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या निवासाची सोय (डॉर्मेटरी) आणि खानपानाची उत्तम व्यवस्थाही या संकुलाचा भाग असणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांसाठी बहुपयोगी सभागृहे आणि स्वागत कक्षही उभारले जाणार आहे.

Tendernama
www.tendernama.com