डॉक्टर तुम्ही सुद्धा! रुग्णालयांच्या औषध खरेदीत 100 कोटींचा घोटाळा

Medicine
MedicineTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील औषध खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ऑल इंडिया फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने केला आहे. स्थानिक औषध पुरवठादारांना हाताशी धरून हा घोटाळा सुरू असल्याचा दावा फाऊंडेशनने केला आहे. तसेच टेंडर प्रक्रिया उशिरा राबवली जात असून त्यामुळे मुंबई महापालिकेला 150 कोटींचा तोटा सोसावा लागल्याची सुद्धा टीका होत आहे.

Medicine
Mumbai : बीएमसीतील घोटाळ्यांचा चेंडू आता राज्यपालांच्या कोर्टात

महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील काही डॉक्टर संगनमताने टेंडर प्रक्रियेत घोटाळा करीत असल्याचा आरोप फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महापालिकेकडे येणाऱ्या रुग्णांना देण्यासाठी इंजेक्शन, गोळ्यांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे लोकल औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी करावी लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसतो. तीन वर्षांपूर्वी टेंडर प्रक्रिया पारदर्शक होती, परंतु आता स्थानिक औषध पुरवठादारांना हाताशी धरून आता घोटाळा सुरू असल्याचा आरोप फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे.

Medicine
Mumbai : 'मेघा'ला बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या टेंडरची लॉटरी

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यूची तपासणी करण्यासाठी लागणारे किट खरेदीसाठी 50 टक्के टेंडर प्रक्रिया राबवली असून 50 टक्के टेंडर प्रक्रिया राबवणे बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. टेंडर प्रक्रिया उशिरा राबवली जात असून यामुळे मुंबई महापालिकेला 150 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत महापालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना गैरव्यवहारांची सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com