पीएम आवास अंतर्गत 13 लाख घरे सौर ऊर्जेवर; 450 कोटींचा पहिला हप्ता लवकरच

Solar Panel
Solar PanelTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील घरे सौर उर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या.

Solar Panel
RTO : सावधान! 2019 पूर्वीचे तुमचे वाहन असेल तर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट आवश्यक, कारण...

सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. राज्यातील ग्रामीण रस्ते तयार करतांना ते सिमेंटचेच करावे, अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रामीण रस्त्यांची कामे थांबवू नयेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पाणंद रस्ते यातील निकष नव्याने ठरविण्यात यावे. कोकणातील साकव तसेच पाणंद रस्त्यांची कामे तात्काळ हाती घेण्यात यावी. गावखेड्यातील प्रत्येक तांड्याकरिता निधी देण्यात आला असून यातील किती कामे झाली यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

Solar Panel
Devendra Fadnavis : 'महाराष्ट्र टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशन' सुरु करा

ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना त्याचबरोबर ग्रामविकासाच्या विविध योजना शंभर दिवसांमध्ये प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com