Devendra Fadnavis : 'महाराष्ट्र टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशन' सुरु करा

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशनची (MTTM) स्थापना, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC) स्थापना, नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभाग, टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागविणे आणि स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्या आहेत.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता विमानाने करा प्रवास! काय म्हणाले CM फडणवीस?

सह्याद्री अतिथीगृह येथे वस्त्रोद्योग विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. फडणवीस म्हणाले, हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या दृष्टीने वृध्दापकाळासाठी निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करण्याबाबत योजना तयार करावी. तसेच प्रसार भारती यांच्या सहकार्याने ‘करघा’ या पारंपरिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारीत करावा. वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करून राज्यातील सूतगिरण्यांमध्ये प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

Devendra Fadnavis
Mumbai अन् Navi Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळ आता एकमेकांना जोडणार! काय आहे प्लॅन?

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com