सिडको मालामाल; खारघरच्या भूखंडाला विक्रमी किंमत; प्रति गुंठा 5 कोटी 54 लाखांचा दर

Kharghar
KhargharTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईत जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. वाशी, नेरुळ आणि खारघर पाठोपाठ सर्वच ठिकाणी भूखंडांनी आता कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका व्यवहारात सिडकोला गुंठ्यामागे ५ कोटी ५४ लाख रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

Kharghar
पुणेकरांसाठी गुड न्यूज! पूर्व भागातील कोंडी सुटणार, 'या' दोन मार्गावर धावणार मेट्रो

नवी मुंबई शहराचा उदय झाल्यानंतर सिडकोने खारघरच्या इतिहासात भूखंडाचा प्रथमच सर्वात महागडा सौदा केला आहे. सेक्टर 14 मधील 3 हजार 235 चौरस मीटरच्या भूखंडाला तब्बल 5 लाख 54 हजार 999 रुपये चौरस मीटरचा तर गुंठ्या मागे 5 कोटी 54 लाख 99 हजार 999 रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे. सिडकोने मागविलेल्या टेंडरमध्ये या भूखंडासाठी 2 लाख 34 हजार 575 रुपये चौरस मीटरचा दर देण्यात आला होता. विहान रिअ‍ॅलिटी बांधकाम समूहाने दुप्पट दराने हा भूखंड खरेदी केला आहे.

Kharghar
Mumbai : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' प्रकल्पासाठी 1594 कोटींची मान्यता

खारघर, ऐरोली, घणसोली, द्रोणागिरी आणि कळंबोली येथील सुमारे 28 भूखंडांच्या विक्रीसाठी सिडकोने टेंडर प्रसिद्ध केले होत. या टेंडर प्रक्रियेत सर्वात जास्त किंमत खारघर सेक्टर 14 मधील भूखंडांना मिळाली. याच सेक्टरमधील 4 भूखंड विहान रिअ‍ॅलिटी या बांधकाम समूहाने घेतले. विशेष म्हणजे या भूखंडाच्या ई-ऑक्शनपेक्षा बंद टेंडरमध्ये भूखंडाची किंमत चढ्या दराने टाकलेली होती. विहान रिअ‍ॅलिटीने घेतलेल्या एका भूखंडाला 5 कोटी 54 लाख 99 हजार 999 रुपये गुंठा याप्रमाणे दर मिळाला. विहान रिअ‍ॅलिटीने दुसरा भूखंड 4 लाख 49 हजार, तिसरा भूखंड 5 लाख 13 हजार आणि चौथा भूखंड 5 लाख 4 हजार रुपये चौरस मीटर या दराने खरेदी केला. याच सेक्टरमधील अन्य दोन भूखंड अन्य दोन बांधकाम व्यावसायिकांनी अनुक्रमे 5 लाख 4 हजार आणि 4 लाख 75 हजार रुपये चौरस मीटर या दराने घेतले. सर्वात कमी दर कळंबोली आणि द्रोणागिरीमधील भूखंडांना मिळाले. हे भूखंड अनुक्रमे 74 हजार आणि 54 हजार रुपये चौरस मीटर या दराने विकले गेले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com