Mumbai : वरळीतील '360 वेस्ट'मध्ये आलिशान घरांसाठी 1200 कोटींची डील

23 आलिशान घरे (फ्लॅट्स) सुमारे 1,200 कोटी रुपयांना विकली
Worli
WorliTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वरळीमध्ये डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड येथील प्रीमियम लक्झरी प्रोजेक्ट असलेल्या थ्री सिक्स्टी वेस्टच्या बी टॉवरमधील 23 आलिशान घरे (फ्लॅट्स) सुमारे 1,200 कोटी रुपयांना विकली गेली आहेत. डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र आणि जवळच्या सहकार्‍यांनी हे विस्तीर्ण अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. प्रकल्पात दोन टॉवर आहेत आणि ते ओबेरॉय रिअ‍ॅल्टी व बिल्डर सुधाकर शेट्टी यांच्या सहाना ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या ओएसिस रियल्टीने विकसित केले आहेत.

Worli
MMRDA : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 100 कोटींचे टेंडर

सुधाकर शेट्टी यांनी हा व्यवहार केला असून, या प्रकल्पातील त्यांच्या अपार्टमेंटमधील शेवटचा हिस्सा विकला आहे. प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी त्यांनी बिल्डर विकास ओबेरॉय यांच्यासोबत भागीदारी केली होती. विक्री केलेल्या प्रत्येक अपार्टमेंटचा आकार सुमारे 5,000 चौरस फूट आहे आणि त्यांना प्रत्येकी 50 ते 60 कोटी रुपये मिळाले आहेत. 23 अपार्टमेंटच्या विक्रीतून मिळालेली संपूर्ण रक्कम शेट्टी यांनी पिरामल फायनान्सकडून घेतलेल्या सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली आहे.

Worli
Nashik : आता नेपाळच्याही नोटांची छपाई होणार नाशिकच्या प्रेसमध्ये

या फ्लॅटची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने सवलतीच्या दरात विक्री करण्यात आल्याचे प्रॉपर्टी मार्केटमधील जाणकारांनी सांगितले. शेट्टी यांच्यावर कर्ज फेडण्यासाठी दबाव होता. शेट्टी यांनी हाँगकाँगस्थित एस. सी. लोवी या जागतिक बँकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन ग्रुपकडून सुमारे 400 कोटी रुपयांचे कर्जही घेतले होते. थ्री सिक्स्टी वेस्टमधील काही मोठ्या अपार्टमेंट्सची यापूर्वी 75 ते 80 कोटी रुपयांना विक्री झाली होती. गेल्या वर्षी, आयजीई (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 151 कोटी रुपयांना या प्रकल्पातील दोन अपार्टमेंट्स खरेदी केले होते. या प्रकल्पात दोन टॉवर आहेत, एका टॉवरमध्ये रिट्झ कार्लटन हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी ब्रँडद्वारे व्यवस्थापित इतर लक्झरी निवासी घरे असतील.

Worli
Railway : पुणे-नाशिक अवघ्या दोन तासांत; प्रकल्पातील मोठा अडथळा दूर

डी मार्टच्या दमानी यांनी गेल्या काही वर्षांत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्टीज मिळवल्या आहेत. त्यांच्या 2021 मधील एका व्यवहाराची नोंद देशातील सर्वात मोठी निवासी मालमत्ता व्यवहार म्हणून झाली आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी दक्षिण मुंबईतील नारायण दाभोलकर रोड येथे 1,001 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला आहे. मधु कुंज हा बंगला, टोनी मलबार हिलमध्ये 60,000 चौरस फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या मोक्याच्या 1.5 एकर जमिनीवर आहे. ग्राऊंड-प्लस-१-मजली बंगला आर्ट डेको शैलीमध्ये बांधला गेला आहे. पुरातन पद्धतीचे बांधकाम (हेरिटेज) अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com