१३८ कोटींच्या लोअर परळ उड्डाणपूलाचा मुहूर्त फिक्स!

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : १३८ कोटींच्या खर्चातून लोअर परळ (Lower Parel) रेल्वे स्थानकाबाहेरील डिलाईल रोड उड्डाणपूल जानेवारी २०२३ मध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. पुलाच्या पहिल्या गर्डरचे काम पूर्ण झाले असून, दुसरे गर्डर ऑगस्ट महिन्यात टाकणार आहे. त्यानंतर रस्त्यावरील उर्वरित कामे बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहेत.

Mumbai
बंडानंतर 'महाविकास'चा कामाचा सपाटा; 160 'जीआर'ला मंजुरी, भाजपचा...

प्रभादेवी आणि अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. त्यानंतर आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने ४५५ पुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते. त्यामध्ये लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार २४ जुलै २०१८ मध्ये पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये मेगाब्लॉक घेऊन या पुलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर आता रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलावर मे २०२२ च्या अखेरीस पहिला गर्डर बसविण्यात येणार होता. परंतु त्यास विलंब झाला. पश्चिम रेल्वेने पाहिला गर्डर टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण केले. आता दुसरा गर्डर ऑगस्ट २०२२ मध्ये बसविण्यात येणार आहे. त्यानंतर रस्त्यावरील उर्वरित कामे बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Mumbai
Good News मुंबई-पुणे-हैदराबाद अवघ्या साडेतीन तासांत! वाचा सविस्तार

लोअर परळ परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक, व्यावसायिक कार्यालये असल्याने, लोअर परळ, करी रोड, पश्चिमेला वरळी नाका आणि पूर्वेला लालबाग आणि भायखळा दरम्यान हजारो प्रवाशांना डिलाईल रोड उड्डाणपूलचा आधार होता. २०१८ पासून डिलाईल रोड उड्डाणपूल बंद असल्याने करी रोडवरून अनेकांना वरळी नाक्यापर्यंत चालतच जावे लागते. तर वाहनचालकांना भायखळामार्गे पूर्ण वळसा घालून जावे लागते. त्यामुळे मुंबईकरांना आणखी सहा महिने हा त्रास सहन करावा लागणार आहे.

Mumbai
फुकटात मिळणाऱ्या वाळूसाठी कोट्यावधींचे टेंडर कशाला?

डिलाईल रोड उड्डाणपूलावर पहिला गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये दुसरा गर्डर टाकण्याचे काम सुरु करण्यात येईल. मुंबई महापालिका आणि रेल्वेचे काम पूर्ण झाल्यावर जानेवारी २०२३ मध्ये हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

पूल बांधणीसाठी खर्च १३८. ४२ कोटी रुपये

या पूलाची लांबी ८५ मीटर

आणि रुंदी ३७ मीटर असणार

वाहतुकीसाठी २७. ५ मीटरचा रस्ता

२ मीटरचा फूटपाथ असणार आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये काम सुरु

जानेवारी २०२३ मध्ये काम पूर्ण होणार

- पहिला गर्डरचे वजन १ हजार टन वजण

- ९० मीटर लांबीचा गर्डर

- २५९ एमटी पेक्षा जास्त क्षमताची- ४ क्रेन

- १०० एमटी पेक्षा जास्त क्षमताची- १ रोड क्रेन

- १७ एमटीची क्षमताची रोड हाईड्रा २ क्रेन

- ७६ कुशल कर्मचारी

- ५० अर्ध कुशल कर्मचारी

- १० इंजिनियर अधिकारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com