प्रवाशांचा बळी गेल्यावर बसस्थानकाचे Tender काढणार काय?

Sambhajinagar ST Stand
Sambhajinagar ST StandTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्याची राजधानी आणि आठ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील बसस्थानकाची इमारत खिळखिळी झाली असून, तीन वेळा भूमिपूजन करूनही नवीन बांधकामाला मुहूर्त मिळालेला नाही.

भविष्यात नुतनीकरण केले जाणार म्हणून एस. टी. महामंडळ फुटकळ दुरुस्तीसाठी देखील पैसा खर्च करत नाही. राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे येथे बसपोर्ट आणि नुतनीकरणासाठी आलेला निधीही तीनदा परत गेला. यानंतर निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे सुमारे ५० वर्षांपूर्वीची कालबाह्य झालेली इमारत वापरण्याची वेळ आली आहे.

Sambhajinagar ST Stand
Pune: वाघोली ते पिंपरी-चिंचवड अंतर कमी होणार! असा आहे मेगा प्लॅन..

सध्या पावसाळा सुरू असल्याने या वापरात असलेल्या इमारतीचा स्लॅबचे तुकडे व पाणी  प्रवाशांच्या कपडे व डोक्यावर पडत आहे. एवढेच नव्हे, तर ही इमारत प्रवाशांच्या डोक्यावरच पडण्याची भीती प्रवाशांना वाटत आहे. त्यामुळे प्रवासी छत सोडून बाहेरच उभे राहून बसची प्रतीक्षा करताना दिसतात. बसस्थानकाच्या आवारात तर थोड्याशा पावसाने चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे.

प्लॅटफार्मच्या दूर थांबलेल्या बस गाठण्यासाठीही प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाच्या नवीन इमारतीची मागणी होत आहे. परंतु, कोणत्याही सरकारच्या काळात बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी अनास्था कायम आहे. याचा त्रास प्रवाशांसह बसच्या वाहक चालकांना होत आहे.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हे ५० वर्षांचे आहे. याच्या नंतर सिडको बसस्थानक बांधण्यात आले. मध्यंतरी मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी सिडको बसस्थानकात बसपोर्ट उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र हा विषय न्यायप्रविष्ट झाल्याने संबंधित प्रस्ताव देखील तळ्यात - मळ्यात आहे. शहागंज बसस्थानक देखील बंदावस्थेत आहे.

Sambhajinagar ST Stand
समृद्धीनंतर 'या' 388 किमी ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गावर मोहोर

या पूर्वीचे रेल्वेस्टेशन परिसरातील रेल्वेच्या जागेवरील बसस्थानक देखील बंद करण्यात आले. परिणामी प्रवाशांना एकमेव मध्यवर्ती बसस्थानकाचाच आधार आहे. तरीही जुन्या बसस्थानकाच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा आहे. बसपोर्ट उभारण्याचा निर्णय सिडको बसस्थानकाच्या जागेवर झाल्यानंतर जुने बसस्थानक पाडून तेथेच सुमारे सतरा  कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती.

कंत्राटदाराची देखील नियुक्ती झाली होती. बसस्थानकालगत जुनी कर्मचारी निवासस्थाने देखील पाडण्यात आली होती. मात्र, महापालिकेने एक कोटी ६२ लाख बांधकाम परवाना शुल्क आकारल्याने यात एस.टी. महामंडळ आणि महापालिकेत बांधकाम परवाना शुल्कमाफीवरून कागदी घोडे नाचविण्याचा खेळ सुरू झाला. त्यात बराच कालावधी उलटल्याने बांधकाम साहित्यात दरवाढीचे कारण पुढे करून एस.टी. महामंडळाकडे सुधारीत दरवाढीचे टेंडर तयार करण्याची मागणी कंत्राटदाराने केली. मात्र एस.टी. महामंडळाने त्याची मागणी फेटाळून लावल्याने हे १७ कोटीचे टेंडर देखील रद्द झाले.

परिणामी बसस्थानकाचे काम रखडले. लोकप्रतिनिधींचा सक्षम पाठपुरावा नसल्याने राज्य सरकार छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाकडे ढुंकूनही पाहत नाही.

Sambhajinagar ST Stand
Amravati : 'या' तालुक्यात होणार 181 कोटींची विकासकामे

साधी डागडुजी देखील नाही
सध्या पक्की इमारत गरजेची असतानाही एसटी महामंडळाच्या विभागीय अभियंत्यांकडून दखल घेतली जात नाही. एवढेच नव्हे, तर साध्या डागडुजीची प्रक्रिया देखील केली जात नाही. धोकादायक छत आणि खाली फुटलेल्या फरशीवर देखील मलमपट्ट्या केल्या जात नाहीत. दुसरीकडे इमारतच इतकी जीर्ण झाली आहे की, याचा काहीही उपयोग होत नाही. तरीही केवळ नुतनीकरणाची आशा लाऊन प्रवाशांचे हाल करणे सुरू ठेवले आहे.

बसस्थानक, आगार, कर्मचारी निवासस्थान मिळून जवळपास वीस ते बावीस एकरचा एकूण परिसर आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे, सर्वाधिक प्रवासी, बसेस असणारे हे बसस्थानक आहे.

Sambhajinagar ST Stand
मुंबई उपनगर डीपीडीसीसाठी 976 कोटी; झोपडपट्टीतील सोयी सुविधांवर भर

मोठ्या दुर्घटनेची शक्यता

दुर्दैवाने जीर्ण इमारत किंवा इमारतीचा भाग मोठ्या पावसात कोसळला तर दुर्घटना घडू शकते. याची चुणूक गतवर्षी पावसाळ्यात दिसून आली होती. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जागे होण्याची गरज आहे. नंतर प्रवाशांना फटका बसल्यावर सांत्वन करून उपयोग होणार नाही.

सध्या निधीची अडचण तर कधी नुतनीकरण होणार असल्यामुळे बसस्थानकात किरकोळ दुरूस्तीचे काम देखील मागे पडले आहे. हा वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी डागडुजी केली जात नसल्याने बसस्थानकाच्या आवारासह छताखाली उभे राहताना प्रवाशांना त्रास होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com