Sambhajinagar : 'या' कारणांमुळे रखडले प्रमुख जलकुंभाचे काम

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : यंदाच्या उन्हाळ्यातही छत्रपती संभाजीनगरकरांवर पाणीपाणी म्हणण्याची वेळ आली असताना नवीन पाणीपुरवठा योजनेतंर्गत दोन वर्षांपूर्वी सिडकोतील पारिजातनगर येथे मंजुर झालेल्या जलकुंभाच्या बांधकामासाठी मजुरांचा पगार, स्टील, बायडींगवायर, खडी, रेती, सिमेंट पुरवठा करण्यास ठेकेदाराला अपयश आले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : रेल्वेस्टेशन उड्डाणपुलासाठी 15 कोटींची तरतूद

महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुचवलेल्या या जागेवर टाकीचे ५१८ मीटर उंच टाकीचे बांधकाम होत आहे. मात्र, जेथे एका टाकीच्या बांधकामासाठी १५ ते २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तिथे केवळ तीन कर्मचाऱ्यांवर इतक्या मोठ्या जलकुंभाचे काम सुरू आहे. सदर काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने कधी आमच्या भागातील २५ हजार ५९२ नागरिकांना पाणी मिळेल, असा सवाल करत येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

Sambhajinagar
Sambhajinagar : क्रीडा संकुलासाठी 7.25 कोटी पण जलतरण तलावाचे काय?

टेंडरनामाचा स्पाॅट पंचनामा

येथील असंख्य नागरिकांच्या तक्रारीवरून प्रतिनिधीने बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास या संपुर्ण कामाचा स्पाॅट पंचनामा केला असता मजुरी मिळत नसल्याने कर्मचारी गावी परत गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे केवळ तीनच कर्मचारी काम करताना आढळले. या कर्मचाऱ्यांना स्टील आणि बायडीग वायर देखील उपलब्ध नाही. ठेकेदाराकडे तगादा लावल्यास इतर जलकुंभावरून तुकडे-ताकडे आणून काम भागवा, असे सांगितले जात आहे. एकूणच या एका जलकुंभाची ही स्थिती असेल तर इतर जलकुंभांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
बीड बायपासवरील देवळाई चौकातील उड्डाणपुलाखाली खोदकामाचे रहस्य काय?

शहरासाठी अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना अत्यंत अपुरी पडत असल्यामुळे महापालिकातर्फे शहर पाणी पुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी ३ सप्टेंबर २०१९ रोजी १६८०.५० कोटी रकमेस तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर सदर प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत सरकारच्या नगरविकास विभागाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर शहर पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर टाकण्यात आली. प्राधिकरणाच्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या हैद्राबादच्या मे. जी. व्ही. पी. आर. इंजिनिअर्स लि. कंपनीला ४ फेब्रुवारी २०२१ कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. सदर योजना ही कंपनीने ३६ महिन्यात पुर्ण केल्यानंतर पुढील १६ महिने देखभाल दुरूस्तीचा काळ ठरलेला होता. मात्र निम्मा कालावधी उलटुन कंपनीने अद्याप २५ टक्के देखील काम पुर्ण केले नाही. दरम्यानच्या काळात अनेक कारणे पुढे करत ही योजना २७०० कोटींवर गेली.२०५२ पर्यंतचे उद्दीष्ट समोर ठेऊन भविष्यातील ३३ लाख १७ हजार ३४२ या लोकसंख्येसाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन १३५ लीटर पाणी मिळावे असे गृहीत धरून योजनेचे काम सुरू आहे.  दरम्यान याच योजनेंतर्गत पारिजातनगरातील जलकुंभाचे काम रखडले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com